भावाच्या अंत्यसंस्कारानंतर झाली कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:01 PM2020-04-12T17:01:43+5:302020-04-12T17:23:54+5:30

अत्यावश्यक सेवांमध्ये असलेले कर्मचारी आपले प्राण पणाला लावून कोरोनाशी लढत आहेत.

CoronaVirus : After her brothers death nilima is ready to fight with corona virus myb | भावाच्या अंत्यसंस्कारानंतर झाली कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

भावाच्या अंत्यसंस्कारानंतर झाली कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

Next

कोरोना व्हायसरमुळे लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान लोक आपापल्या घरी सुरक्षित असले तरी अनेकांना गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेले कर्मचारी आपले प्राणपणाला लावून कोरोनाशी लढत आहेत. तर कधी गोरगरीबांचा आधार सुद्धा बनत आहेत. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मध्यप्रदेशातील  शिप्रा येथे राहणारी एएनएम आणि आयुष्यमान योजनेची समन्वयक  नीलिमा परमार हिच्या भावाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूनंतर सुद्धा कोरोनाशी लढा देण्याचं काम सुरू ठेवलं आहे. अशा कठीण  प्रसंगी नीलिमा भावाच्या अंत्यदर्शनात सहभागी झाली. तिने आपली वहिनी आणि कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचं काम केलं आणि त्यानंतर नोकरीवर हजर झाली आहे.  

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी  फिल्डवर जाऊन नीलिमा लोकांना महत्त्वपूर्ण माहिती पूरविण्याचे काम करते. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून देते.  निलिमा सांगते की त्यांची टीम मुख्य चौकांमध्ये माइकवरुन नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या उपाययोजना, सोशल डिस्टन्सिंगचं महत्व सांगत आहे. यातून कोरोनाला  हरवण्याच्या उद्देशाने जगजागृती केली जात आहे.

निलिमाची ही उत्तम कामगिरी पाहून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तिचं  सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. दु:खद प्रसंगातही ती आपलं काम नेटाने करीत आहे. त्यांच्या अशा अभूतपूर्व कामामुळे त्यांना कोरोना वॉरियर्स म्हटलं जात असल्याचे शिवराज सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. निलिमाची ही कामगिरी भास्कर समूहाने प्रसिद्ध केली आहे. मध्यप्रदेशच्या  मुख्यमंत्र्यांनी ही बातमी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट केली आहे.

Web Title: CoronaVirus : After her brothers death nilima is ready to fight with corona virus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.