CoronaVirus : आनंद महिंद्रांकडून Work From Homeचा मजेशीर किस्सा शेअर; म्हणाले, मीसुद्धा लुंगीवर घेतो मीटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 03:45 PM2020-04-06T15:45:51+5:302020-04-06T15:49:13+5:30
आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विट करत एका बाजूला अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला खरी परिस्थिती दर्शवली आहे.
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे मीम्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कशा पद्धतीनं वर्क फ्रॉम होमचा आनंद लुटतायत हे पाहण्याजोगं आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विटरवर वर्क फ्रॉम होमशी संबंधित मीम्स शेअर केला आहे.
आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विट करत एका बाजूला अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला खरी परिस्थिती दर्शवली आहे. माझ्या #whatsappwonderboxच्या माध्यमातून फोटो शेअर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या फोटोमध्ये जिथे 'एक्सपेक्टेशन' लिहिलं आहे, त्या बाजूला एक व्यक्ती कोट आणि पँट परिधान करून आरामात घरात बसून काम करताना दिसतोय, तर रिएलिटीमध्ये वर्क फ्रॉम होमदरम्यान एक व्यक्ती लुंगी घालून स्वयंपाकघरात जेवण बनवताना पाहायला मिळतो आहे. या फोटोवर आनंद महिंद्रा लिहितात, मीसुद्धा ऑफिसचं काम घरून करत असताना शर्ट आणि लुंगी घालून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेत असतो. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान मी नेहमीच ध्यानात ठेवतो की मला उभं राहायचं नाही.
आनंद महिंद्रांच्या या मीम्सला आतापर्यंत १९०००हून अधिक लोकांनी लाइक केलं असून, लाखो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनीच जास्त करून यावर कमेंट्स केल्या आहेत.On a lighter note, this is from my #whatsappwonderbox. And I have a confession to make:On some Video Calls from home, I DID wear a lungi under my shirt. Didn’t have to stand up at any point during the meetings, but I suspect my colleagues may ask me to do so after this tweet! pic.twitter.com/e1IElefNaa
— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2020
२१ दिवस लॉकडाऊन असूनही भारतात कोरोना व्हायरसचा कहर थांबायचं नाव घेत नाहीये. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या चार हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसमुळे १०९ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ४०६७ लोक या संसर्गाचे बळी ठरले आहेत. बरे होणा-या रुग्णांची संख्या २३२ आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत ३२ लोकांचा मृत्यू झाला असून, ६९३ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.reality sir 😅 pic.twitter.com/RhR2Q8gpic
— UMANG NEGANDHI (@colashooterpro) April 5, 2020