Lockdown : 'पती आंघोळही करत नाही अन् रोज शरीरसंबंधाची मागणी करतो', विचित्र प्रकाराची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:10 PM2020-04-20T14:10:18+5:302020-04-20T14:31:11+5:30
काही दिवसांपूर्वी घाना देशातील एका महिलेची अशीच तक्रार चर्चेचा विषय ठरली होती. आता भारतीतली महिलांनाही अशा समस्येचा सामना करावा लागत आहे.
(सांकेतिच छायाचित्र)
काही दिवसांपूर्वी आफ्रिकन देश घानातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तिने सरकारकडे लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली होती, कारण ती तिच्या पतीच्या सततच्या शारीरिक संबंधाच्या मागणीला वैतागली होती.
आता अशीच तक्रार भारतातील एक महिलेने केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देभभरात लॉकडाऊन आहे आणि लोक घरातच आहेत. दरम्यान बंगळुरू पोलिसांच्या महिला हेल्पलाईनवर एका महिलेचा कॉल करुन आपली तक्रार दाखल केली.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येथील महिलेने पोलिसांच्या 'परिहार' या विशेष हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला होता. यावेळी तिने पोलिसांकडे जी तक्रार केली त्याने पोलिसही चक्रावले.
महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, ज्या दिवसापासून लॉकडाऊन सुरु झाला त्या दिवसापासून तिच्या पतीने आंघोळच केली नाहीये. महिलेचा आरोप आहे की, नवरा आंघोळही करत नाही आणि दररोज शारीरिक संबंधाची मागणी करतो.
पतीच्या वागण्याला वैतागलेल्या या महिलेने तक्रारीत सांगितले की, तिचा पती एका दुकानात काम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दुकान बंद आहे आणि तेव्हापासून म्हणजेच २४ मार्चपासून पतीने आंघोळ करणंही बंद केली आहे.
इतकेच नाही तर या महिेलेने तिच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, कोरोनामुळे स्वच्छता ठेवणं आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. मात्र, पती दुर्लक्ष करतो. उलट दररोज शारीरिक संबंधाची मागणी करतो. तसेच, त्याला संबंध ठेवण्यास नकार दिला तर त्याने मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील विविध भागांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यांतील पोलिसांनी विशेष हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. ज्यावर अनेक तक्रारी येत आहेत.