लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन् महिनाभरात केलं असं काही, की थेट तंबूत राहायला जावं लागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 05:11 PM2020-04-26T17:11:44+5:302020-04-26T17:41:14+5:30

इथं जमलेत त्यांचे होईनात अन् हे ३० दिवसातं जिकडं तिकडं प्रेमात पडत आहेत.

CoronaVirus : colombia couple fall in love in corona shelter home got married in lockdown myb | लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन् महिनाभरात केलं असं काही, की थेट तंबूत राहायला जावं लागलं

लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन् महिनाभरात केलं असं काही, की थेट तंबूत राहायला जावं लागलं

Next

कोरोनामुळे जगभरात सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झालं आहे. लोकांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून वाचवण्याासाठी तसंच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. घरी असलेल्या लोकांना कधी एकदा लॉकडाऊन संपून फिरायला जातोय असं झालं आहे. तर जे लोक आपल्या प्रियजनांपासून लांब आहेत. त्यांना आपल्या पार्टनरला कधी एकदा भेटतोय अशी भावना आहे.

अलिकडे लॉकडाऊनमध्ये असलेले कपल्स एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या कपल्सने लग्नगाठ सुद्धा बांधली आहे.  मारिया ओसोरिओ आणि अल्फोन्सो अर्डीला यांची भेट घर नसलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये झाली.

मारिया ३९ वर्षांची आहे. ती एका मिशनरीमध्ये काम करत होती. पैसे नसल्यामुळे गेला एक महिना मारिया कोलंबियातील मनिझालेस येथील एका शेल्टर होममध्ये राहत होती. अल्फोन्सो हा मजूरीचे काम करतो. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कामं बंद असल्यामुळे तो ही या शेल्टर होममध्ये राहायला आला. येथेच त्यांची भेट झाली. लॉकडाऊनमुळे दोघांकडेही काम नव्हते. राहण्यासाठी जागा नव्हती.

या दोघांचं प्रेम अनपेक्षित होतं. "आम्ही सामाजिक नियमांचे उल्लंघन केले नाही. आम्ही शेल्टर होममध्ये राहत असल्यामुळे इतर कामं केल्यानंतर रिकामा  वेळ असायचा. त्यामुळं आम्ही खूप संवाद साधायचो. आमची परिस्थिती तशी सारखी होती. माझ्या डोक्याला दुखापत झाल्यामुळं मारिया माझी खूप काळजी घ्याची.  मी खूप खूश आहे की लॉकडाऊनमध्ये मला आयुष्यभरासाठी सोबती मिळाला", असे अल्फोन्सोनं न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितलं.( हे पण वाचा-बापरे! लॉकडाऊनमध्ये दातांचा डॉक्टर नाही, म्हणून या बाप-लेकाने केलं असं काही....)

या दोघांनी मास्क लावून लग्न केलं. या दोघांच्या लग्नात शेल्टर होममधील इतर लोक उपस्थित होते. सध्या या दोघांना वेगळा तंबू राहण्यासाठी देण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यांनंतर कुटुंबियांची भेट घेण्याचं मारियाने ठरवलं आहे.( हे पण वाचा-५ मीटर कापडाने केली सुरुवात, मास्क शिवणाऱ्या आजीबाईला शेजाऱ्यांकडून मदतीचा हात)

Web Title: CoronaVirus : colombia couple fall in love in corona shelter home got married in lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.