CoronaVirus: जनजागृतीसाठी रस्त्यावर ‘कोरोना कार’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:23 AM2020-04-19T00:23:01+5:302020-04-19T00:23:31+5:30
सहा चाकांच्या सिंगल सीटर वाहनाचे उद्घाटन
एका भारतीय कार संग्रहालयाने कोरोना कार नावाची व्हायरसची आकाराची कार रस्त्यावर आणली आहे. सहा चाकांच्या या वाहनाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हे वाहन ताशी २५ मैल वेगाने वेगाने धावू शकते. हे सिंगल सिट वाहन तयार करण्यासाठी सुधाकर यांना १० दिवस लागले.
बहादुरपुरा येथील सुधा कार्स म्युझियमच्या कन्याबोयना सुधाकर यांनी सांगितले की, जागतिक महामारीच्या वेळी विषाणू प्रसार कमी करण्यासाठी उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे वाहन डिझाइन केले आहे. ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या कोरोना व्हायरससारखे आहे. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी मी कारची विषाणूच्या आकारात रचना केली आहे. जेणेकरून लोकांद्वारे सामाजिक अंतराबद्दल जाणीव जागृत केली जाऊ शकते. जनजागृती मोहिमेसाठी पोलीस किंवा अन्य सरकारी यंत्रणांना अशा प्रकारचे वाहन उपलब्ध करुन देण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मी नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रसंगी स्वत: च्या पद्धतीने समाजाला संदेश देण्यासाठी मोटारी बनवल्या आहेत. सध्या लोकांना घरी राहण्यास आणि सुरक्षित रहायला सांगणे महत्वाचे आहे आणि कोरोना व्हायरस कार म्हणजे संदेश देणे आहे, असे ते म्हणतात.