CoronaVirus : कोरोनापासून लांब असलेला देश, जिथे लोकांचा मस्त खाऊन-पिऊन एन्जॉय चाल्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:15 PM2020-03-27T17:15:08+5:302020-03-27T18:32:03+5:30
सध्या ठिकाणी कोरोना व्हायरसशी भीती जरासुद्धा नाहीये
जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. भारतात सुद्धा कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा यासाठी लोकांना आपापल्या घरी राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
अशा गंभीर परिस्थितीत बेलारूस हा देश असा आहे. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसची भीती जरासुद्धा नाहीये. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोकांना सार्वजनीक ठिकाणी जाण्यासाठी आणि फिरण्याासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण या देशात लोक आनंदी आहेत, तसंच कोरोनाचं कोणतंही भय त्यांना नाही. फुटबॉल मॅचच्या तयारीत आहेत. या ठिकाणी शाळा, कॉलेजेस आणि बाजारपेठा सुरळितपणे चालू आहेत.
सध्या बेलारूस या देशात फुटबॉल लिग खेळली जात आहे. सुरूवातीला असं सांगण्यात आलं की कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ही लिग कॅन्सल करण्यात येईल पण असं काहीही झालं नाही.
बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्ज़ेंडर लूकाशेन्को यांना युरोपचे डायरेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. ते असं म्हणतात की फक्त मनोवैज्ञानिक स्थिती आहे. त्यामुळे अनेकांना फायदा होत आहे तर अनेकाचं नुकसान, त्यामुळे त्या देशातील परिस्थिती चिंताजनक नाही.
लोक फुलबॉलच्या मॅचचा आनंद घेत आहेत. इतकंच नाही तर सिनेमागृह सुद्धा या देशात सुरू आहेत.