कोई सरहद ना इन्हे रोके! लॉकडाऊनमध्येही ते सीमेवर भेटतात, गप्पा मारतात अन् आपापल्या घरी जातात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:37 PM2020-04-01T13:37:34+5:302020-04-01T13:54:22+5:30
दोन वेगवेगळ्या देशात राहणारं हे कपल दररोज त्यांच्या देशांच्या बॉर्डरवर येऊन एकमेकांसोबत वेळ घालवतं.
'जिनके सर हो इश्क़ की छाँव, पाँव के नीचे जन्नत होगी' या गुलजारांच्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील. म्हणजे जे प्रेमात असतात त्यांना कशाची काही चिंता नसते. अशाच एका कपलची सध्या चर्चा रंगली आहे. दोन वेगवेगळ्या देशात राहणारं हे कपल दररोज त्यांच्या देशांच्या बॉर्डरवर येऊन एकमेकांसोबत वेळ घालवतं.
कोरोना व्हायरसमुळे सध्या अनेकांचा वाईट दिवस सुरू आहेत. खासकरून ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवायचा असतो त्यांना भेटूही शकत नाही. पण काही असेही लोक असतात जे जगापेक्षा वेगळे असतात. त्यांना कशाचीही भीती वाटत नाही.
अशाच एका कपलची चर्चा सध्या रंगली आहे. हे दोघे जर्मनी आणि डेन्मार्कच्या बॉर्डरवर रोज भेटतात. आजोबांचं वय आहे 89 आणि आजींचं वय आहे 85. दोघे बसतात, गप्पा करतात, ड्रिंक्स घेतात, खातात आणि आपापल्या घरी जातात.
85 वर्षीय Inga Rasmussen या डेन्मार्कमध्ये राहतात आणि 89 वर्षीय आजोबा Karsten Tuchsen Hansen जर्मनीत राहतात. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन आठवड्यापासून जर्मनी-डेन्मार्क बॉर्डर बंद करण्यात आली आहे. लोकांनी स्वत:ला लॉकडाऊन घरून घेतलं आहे. पण कोरोना या दोघांना भेटण्यापासून रोखू शकला नाही. ते रोज भेटतात आणि गप्पा करतात.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हे दोघे गेल्या एक वर्षापासून रोज भेटतात. Igna आणि Karsten दोघेही सोशल डिस्टंसिंग ठेवत भेटतात. Karsten हे त्यांच्या ई-बाइकने बॉर्डरवर पोहोचतात तर Inga त्यांच्या कारने येतात.
Igna आणि Karsten दोघेही बॉर्डरवर कठड्याच्या दोन्ही बाजूने बसतात. दोघेही खाण्या-पिण्याच्या वस्तू सोबत घेऊन येतात. हे सगळं करत असताना ते सोशल डिस्टंसिंगचं पूर्ण पालन करतात. तर हे असं आहे प्रेम.