Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:01 AM2020-05-28T10:01:08+5:302020-05-28T10:03:30+5:30

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे

Coronavirus: lockdown anup ojha 23 years old eats 40 loaves and 20 plates of rice pnm | Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

Coronavirus: भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

Next
ठळक मुद्देक्वारंटाईन सेंटरमधील अनुप ओझा सर्वांसाठी चर्चेचा विषयअनुपचं रोजचं जेवण पाहून प्रशासकीय अधिकारीही झाले हैराण१० माणसांचे जेवण एकटाच करतो फस्त

बक्सर – सध्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असल्याने संभाव्य कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. बिहारच्या बक्सर येथे असणाऱ्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या भलतीच चर्चा सुरु आहे. या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या युवकाची भूक सर्वांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. चर्चेवर विश्वास न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असता ते दृश्य पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत.

या युवकाचा खुराक ४० चपात्या आणि २० प्लेट भात आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना, या युवकाची भूक पाहून क्वारंटाईनमधील लोक आणि अधिकारी हैराण झाले आहेत. दहा लोकांचे जेवण एकटा खात असल्याने हा युवक मंझवारीच्या राजकीय बुनियादी मध्य विद्यालयातील क्वारंटाईन सेंटरसाठी चर्चेचा केंद्र बनला आहे. हा युवक नाश्त्याला ४० चपात्या खातो तर दुपारी जेवणात २० प्लेट भात खातो.

खरहा टांड पंचायत परिसरात राहणारा २३ वर्षीय युवक अनुप ओझा हा सध्या मंझवारी गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये लिट्टी बनवण्यात आली होती तेव्हा अनुपने एकट्याने ८३ लिट्टी खाल्ल्याने सगळेच अवाक् झाले असल्याचं क्वारंटाईनमधील इतर लोकांनी सांगितले. ज्यावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये खाद्य सामानाची कमतरता भासू लागली तेव्हा अधिकाऱ्यांनी याचं कारण विचारलं. तेव्हा अनुप ओझाबद्दल कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसला नाही.

त्यामुळे एकेदिवशी अधिकारी दुपारच्या जेवणावेळी क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहचले. तेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनुपला जेवण करताना पाहिलं तेव्हा तेदेखील हैराण झाले. क्वारंटाईन सेंटरचे विकास प्राधिकरण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, अनुप नाश्त्याला ४० चपात्या खातो, आता जेवण बनवणाऱ्यांनी अनुपसाठी चपात्या बनवण्यास नकार दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने चपात्या बनवण्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुपसाठी आता दिवसातून दोनदा भात देण्यात येणार आहे. अनुपच्या खुराकात काहीही कमी पडायला नको अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच अनुपला १० दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये आणलं होतं. तो कामाच्या शोधात राजस्थानला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो घरी जाण्यासाठी परतला. पण घरी जाण्यापूर्वी त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. लवकरच त्याचा क्वारंटाईन संपेल, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमधील इतर लोक आणि अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडतील.  

Web Title: Coronavirus: lockdown anup ojha 23 years old eats 40 loaves and 20 plates of rice pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.