CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी बकऱ्यांना 'असा' तयार केला मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:42 PM2020-04-09T18:42:38+5:302020-04-09T18:52:11+5:30

फक्त माणसांनांच नाही तर जगभरात वेगवेगळ्या प्राण्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

CoronaVirus : Man tie masks on goats as protection news from andra pradesh myb | CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी बकऱ्यांना 'असा' तयार केला मास्क

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी बकऱ्यांना 'असा' तयार केला मास्क

googlenewsNext

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. वैयक्तीक पातळीवर स्वतःची काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. फक्त माणसांनांच नाही तर जगभरात वेगवेगळ्या प्राण्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अशाच स्वतःसोबतच प्राण्यांची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.  कारण भारतातील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक प्राणी पाळतात. तसंच पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा केला जातो. त्यामुळे प्राण्यांची सेफ्टी  लक्षात घ्यायला हवी. आंध्रप्रदेशातील कालूर मंडल येथील एका व्यक्तीने आपल्या बकऱ्यांना सुद्धा मास्क घातले आहेत.

व्यंकटेशराव नावाच्या या व्यक्तीकडे २० बकऱ्या आहेत. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह बकऱ्यांवरच चालतो. बकऱ्यांना चारण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे बकऱ्यांना  इतरांच्या जमिनीवर घेऊन जावं लागतं. तसंच त्यांना अमेरिकेतील वाघाला कोरोना झाल्याच्या घटनेबद्दल कळलं नंतर त्यांनी आपल्या बकऱ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्कल लढवली आणि त्यांना मास्क तयार केले आहेत. बकऱ्यांना घेऊन जाताना व्यंकटेश स्वतःसुद्धा मास्क वापरतात.

चीनमध्ये सुद्धा कोरोनापासून पाळीव प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी मास्क लावले होते.  हा फोटो सोशल मीडियावर खूप पाहिला जात होता.

Web Title: CoronaVirus : Man tie masks on goats as protection news from andra pradesh myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.