VIDEO: तुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था; मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:38 AM2020-05-05T11:38:17+5:302020-05-05T11:38:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: दारूच्या दुकानाबाहेर रांगेत उभ्या असलेल्यांवर पुष्पवृष्टी; दिल्लीतील प्रकार

CoronaVirus marathi News Man showers petals on tipplers says you are my economy kkg | VIDEO: तुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था; मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षाव

VIDEO: तुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था; मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षाव

Next

दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लागल्या. दिल्लीतल्या चंदेर नगर भागातही आज सकाळी मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर रांग लावली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं रांगेत उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवर्षाव केला.

दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवृष्टी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था आहात. सरकारकडे पैसा नाही, असं म्हणत दिल्लीच्या चंदेर नगर भागात लागलेल्या रांगेवर एका व्यक्तीनं पुष्पवर्षाव केला. गेल्या ४० दिवसांपासून मद्यविक्री बंद होती. मात्र कालपासून देशभरात मद्यविक्रीला सुरुवात झाली. त्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबचलांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.




दारू खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा, त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती यामुळे आता दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरू आहे. मद्यविक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गेल्या चाळीस दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं अर्थव्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल आटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रानं मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र दारू खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सरकारसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

Web Title: CoronaVirus marathi News Man showers petals on tipplers says you are my economy kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.