coronavirus : कडक सॅल्यूट! कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची काळजी घेतोय 'हा' कुत्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 04:18 PM2020-03-28T16:18:50+5:302020-03-28T16:47:00+5:30
अमेरिकेतून एक फोटो समोर आला आहे. ज्यात एक थकलेले डॉक्टर एका कुत्र्यासोबत बसले आहेत.
कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी जगभरातील डॉक्टर लढत आहेत. त्यांचं काम वाढलं आहे. अनेक डॉक्टरांना रूग्णांवर उपचार करताना आपला जीव गमवावा लागलाय. इटलीमध्ये तर डॉक्टरांची 24-24 तासांची शिफ्ट लावण्यात आली आहे. इतका वेळ काम करून डॉक्टर डिप्रेशनमध्ये येत आहेत. अशात त्यांचं डिप्रेशन कमी करण्याचंही काम प्रशासन करत आहे. त्यांना वेगवेगळ्या थेरपी दिल्या जात आहेत.
अमेरिकेतून एक फोटो समोर आला आहे. ज्यात एक थकलेले डॉक्टर एका कुत्र्यासोबत बसले आहेत. हा कुत्रा काही सामान्य कुत्रा नाही. हा थेरपी डॉग आहे. हा कुत्रा सध्याच्या स्थितीत अमेरिकेतील डॉक्टरांची मदत करत आहे.
या कुत्र्याचं नाव आहे Wynn. रोज हा कुत्रा डेनवरमधील मेडिकल सेंटरला जातो. इथे हा कुत्रा कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत वेळ घालवण्यासाठी येतो.
जेव्हा डॉक्टर्स ब्रेकवर असतात तेव्हा याच कुत्र्यासोबत खेळतात. त्याला जवळ घेतात. हे सगळं यासाठी केलं जात आहे की, डॉक्टर्स त्यांच्या कामामुळे तणावात येऊ नये. त्यामुळे Wynn त्यांना डॉग थेरपी देतो.
आपल्या ब्रेक टाइममध्ये मेडिकल स्टाफना या कुत्र्यासोबत खेळण्याआधी हात धुवावे लागतात. त्यानंतरच ते त्याच्यासोबत खेळू शकतात. असे मानले जाते की, डॉगी थेरपी ही डिप्रेशन दूर करण्याची एक चांगली थेरपी आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये ही थेरपी फार चालते.
हा कुत्रा सिनीअर डॉक्टरांचा आहे. ते याला ट्रेन्ड करत आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचं वाढतं काम पाहून त्यांच्यासाठी म्युझिक रूमही सुरू केल्या आहेत. मेडिटेशनसाठी एक कमी प्रकाशाची रूमची केली आहे.