CoronaVirus : हॉस्पिटलमधून प्रोटेक्शन किट मिळाला नाही म्हणून, 'या' महिलेने केलं असं काही.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 05:45 PM2020-04-02T17:45:38+5:302020-04-02T17:46:10+5:30
कोरोनाची लागण होण्यापासून लोकांना वाचण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलकडे प्रोटेक्शन किट देण्याची ...
कोरोनाची लागण होण्यापासून लोकांना वाचण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलकडे प्रोटेक्शन किट देण्याची मागणी केली होती. ही मागणी सातत्याने होऊनही कोणतंही प्रोटेक्शन किट पुरवण्यात आलं नव्हतं. म्हणून एका डॉक्टर महिलेने स्वतःच शक्कल लढवली आहे. ही महिला भागलपूर येथिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे.
या महिलेने स्वतःच्या कारच्या कव्हरपासून प्रोटेक्शन किट तयार केलं आहे. महिला प्रसुती विभागात कार्यरत असलेल्या डॉ. गीता रानी यांनी बुधवारी कारच्या कव्हरपासून किट तयार केलं आहे. हे किट घालून त्यांनी एका महिलेची सर्जरी सुद्धा केली. यु-ट्यूबवर व्हिडीओ पाहून या महिलेने आपल्या मापाचं प्रोटेक्शन किट तयार केलं.
अनेकदा धुवून या किटचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. त्यांनी भारत सरकार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांना इमेलद्वारे संदेश पाठवून असं सांगितलं की, सगळे लोक आपापल्या घरातून किटसह जर छत्री घेऊन बाहेर पडतील तर तीन फुटांचं अंतर ठेवलं जाईल. यातून त्यांनी सोशल डिस्टंसिंगचं महत्व सांगितलं आहे.