Corornavirus : सिंगापूरमध्ये मास्क नाही तर कंडोमचा भासतोय तुटवडा, लोक 'प्रोटेक्शन' म्हणून करताहेत वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:36 PM2020-02-14T12:36:26+5:302020-02-14T12:36:49+5:30
कोरोना व्हायरसचा धोका कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेले ४७ पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोना व्हायरसचा धोका कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेले ४७ पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सिंगापूर सरकारने ७ फेब्रुवारीलाच ऑरेंज लेव्हल अलर्ट जारी केलाय. या अलर्टनंतर सिंगापूरमधील लोकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जास्तीत जास्त लोक आवश्यक वस्तुंची खरेदी करू लागले आहेत. जेणेकरून माहामारीवेळी त्यांना घरातून बाहेर पडावं लागू नये. यात एक आश्चर्याची बाब म्हणजे इथे औषधे आणि मास्कचा तुटवडा नाही तर कंडोमचा तुटवडा भासत आहे. पण या कंडोमचा वापर लोक सुरक्षित शारीरिक संबंधासाठी नाही तर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी करत आहेत.
कंडोमचा अजब वापर
(Image Credit : nst.com.my)
सिंगापूरमधील लोक मास्क, सॅनिटायजर आणि लवकर खराब होणारे पदार्थ खरेदी करत आहेत. अशात त्यांनी व्हायरसपासून बचावासाठी एक अजब उपाय शोधून काढला आहे. ज्यावरून त्यांची खिल्लीही उडवली जात आहे. सिंगापूरमधील लोकांनी भरपूर प्रमाणात कंडोम खरेदी केले आहेत. इतके की, सिंगापूरमध्ये कंडोमचा तुटवडा झाला आहे.
काय करतात काय?
रेडीट आणि ट्विटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर जे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यातून हे समोर येतं की, लोक कंडोम बोटांमध्ये घालत आहेत. जेणेकरून लिफ्ट किंवा एलिव्हेटरचा वापर करताना त्यांना बटन दाबताना व्हायरसची लागण होऊ नये. असे सांगण्यात आले आहे की, व्हायरस दरवाज्यांचे हॅंडल आणि लिफ्टच्या बटनवर जास्त वेळ जिवंत राहतात. काही लोकांचं मत आहे की, बोटांमध्ये कंडोम घालण्याऐवजी ग्लव्स वापराने ज्याने जास्त सुरक्षा मिळेल.
Reasons for overcrowding in Singapore in the next decade or so:
— 미카엘라 🍑🍃🐻 #5𝐍𝐀𝐋𝐋𝐘 (@mypeachperfect) February 7, 2020
sg stores running out of condoms due to overreacting sgreans using condoms as gloves during the virus outbreak instead of its actual purpose pic.twitter.com/YX1bsCyAlD
सोशल मीडियातून खिल्ली
बोटांमध्ये कंडोम घालत असल्याने लोकांची खिल्ली उडवली जात आहे. काही लोक सांगत आहे की, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात नेहमी साबण आणि पाण्याने धुवावेत, बाहेर जाताना मास्क वापरावा आणि शिंकताना टिश्यू पेपर वापरावा. कारण व्हायरस श्वासांच्या माध्यमातून शरीरात जाऊ शकतात.