दुर्मीळ पालीची किंमत एक कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारपेठेत प्रचंड मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:39 AM2017-08-22T01:39:15+5:302017-08-22T01:39:21+5:30
आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत टोके गेको नावाच्या पालीला प्रचंड मागणी आहे. ही पाल दुर्मीळ आहे. या पालीचा वापर पौरुषत्व वाढवण्याच्या औषधात केला जातो. तिच्या मांसापासून मधुमेह, नपुसंकत्व, एड्स आणि कर्करोगावरील औषधे बनवली जातात.
आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत टोके गेको नावाच्या पालीला प्रचंड मागणी आहे. ही पाल दुर्मीळ आहे. या पालीचा वापर पौरुषत्व वाढवण्याच्या औषधात केला जातो. तिच्या मांसापासून मधुमेह, नपुसंकत्व, एड्स आणि कर्करोगावरील औषधे बनवली जातात.
मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि आसाममध्ये या पालीच्या तस्करांची संख्या वाढत आहे. टोके गेको पालीची तस्करी ईशान्य भारतीय राज्यांतून दक्षिणपूर्व अशियायी देशांत केली जाते. दक्षिण पूर्व अशियायी देशांमध्ये तिला मोठी मागणी आहे.
तेथील लोकांना असे वाटते की गेकोच्या मांसापासून बनवलेल्या औषधांमुळे अनेक आजारांवर उपचार होऊ शकतात. इंडोनेशिया, बांगलादेश, ईशान्य भारत, फिलिपिन्स आणि नेपाळमध्ये सापडणा-या या पालीची किमत एक कोटी रुपयांपर्यंत सांगितली जाते.
म्यानमारमध्ये राहणारे व्यापारी या पालींना चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स व दुस-या दक्षिण पूर्व अशियायी देशांना विकतात. पालीला असलेली मोठी मागणी ही लोकांमधील अंधश्रद्धेचाच एक भाग आहे म्हणून तर लोक ही पाल कुठे दिसते का म्हणून तिचा शोध घेत फिरत असतात. विदेशांत या पालीला खूप मागणी आहे.
एक किलो टोकेच्या मांसापासून तयार केलेल्या औषधाला आंतरराष्ट्रीय बाजारात १० हजार युरोपर्यंतची रक्कम मिळू शकते. त्यामुळे लोक या पालीला पकडून मारून टाकून आंतरराष्ट्रीय बाजारात विकून पैसा कमावत आहेत. परिणामी ही पाल कायमची नष्ट होण्याची भीती आहे.