जगातले असे काही देश जिथे महिला करू शकता दोन पती, कुठे कुठे तर त्याहून जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:37 AM2023-02-24T09:37:28+5:302023-02-24T09:39:27+5:30
Marrige life: तसं तर तुम्ही एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण जेव्हा महिलांचा विषय येतो तेव्हा लोक अवाक् होतात. जगात पाच देश असे आहेत जिथे महिला एकापेक्षा जास्त पती करू शकतात.
Marrige life: महिला सामान्यपणे एका व्यक्तीसोबत लग्न करून आपलं जीवन जगत असतात. भारतात एकापेक्षा पती असणं बेकायदेशीर मानलं जातं. पण जगात काही देश असे आहेत जिथे पत्नी पती करू शकते. तसं तर तुम्ही एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण जेव्हा महिलांचा विषय येतो तेव्हा लोक अवाक् होतात. जगात पाच देश असे आहेत जिथे महिला एकापेक्षा जास्त पती करू शकतात.
नेपाळमध्ये बहुविवाह प्रथा
तशी तर नेपाळमध्ये बहुविवाहावर बंदी आणली गेली आहे. पण हुमला, डोलपा आणि कोसीसारख्या भागांमध्ये आजही बहुपती प्रथा सुरू आहे. इथे महिला त्यांच्या ईच्छेने एकापेक्षा जास्त विवाह करू शकतात. यावर कोणताही कायदा महिलांना रोखू शकत नाही.
नायजेरिया
नायजेरिया एक आदिवासी लोकांचा देश आहे. या देशातही एकापेक्षा जास्त पती ठेवण्याची परवानगी आहे. उत्तर नायजेरियाच्या इरिग्वेमध्ये बहुपती विवाह खूप आहे. इथे आजही महिला एकापेक्षा जास्त पुरूषांसोबत विवाह करतात.
केनिया
केनियामध्ये मोठ्या संख्येने मसाई जमातीचे लोक राहतात. इथे बहुपतीच्या घटना मोठ्या संख्येने बघायला मिळतात. इथे महिला एकापेक्षा अधिक पुरूषांसोबत लग्न करू शकतात.
चीन
चीनबाबत सांगायचं तर येथील प्रथा जरा वेगळी आहे. चीनच्या तिबेट भागात एक महिला घरातील अनेक भावांसोबत विवाह करू शकते. अशा बऱ्याच घटना इथे बघायला मिळतात. पण महिला कुणालाच सांगत नाही की, कोणता मुलगा कुणाचा आहे. सगळेच आपल्या मुलांचा सांभाळ करतात.
भारत
नीलगिरीटा टोडा, त्रावणकोरच्या नायर, उत्तराखंडच्या जौनसार बावर, अरुणाचल प्रदेशच्या गाईलोंग, केरळच्या माला मलेसर इत्यादी भागांमध्ये आजही ही प्रथा आहे. येथील महिलांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार आहे. त्यांना यासाठी रोखलं जात नाही.