जगातल्या या देशांकडे नाही आर्मी, दुसऱ्या देशांवर सुरक्षेची जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 02:08 PM2018-06-15T14:08:18+5:302018-06-15T14:08:18+5:30

आता कुठे या देशांची माहिती हळूहळू समोर येत आहे. काही देश असेही आहेत ज्यांच्याकडे त्यांची आर्मी सुद्धा नाहीये. चला जाणून घेऊया जगातले असे 11 देश ज्यांच्याकडे त्यांची आर्मी नाहीये.

Countries without their own army force | जगातल्या या देशांकडे नाही आर्मी, दुसऱ्या देशांवर सुरक्षेची जबाबदारी!

जगातल्या या देशांकडे नाही आर्मी, दुसऱ्या देशांवर सुरक्षेची जबाबदारी!

Next

जगात कितीतरी देश आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल. आता कुठे या देशांची माहिती हळूहळू समोर येत आहे. काही देश असेही आहेत ज्यांच्याकडे त्यांची आर्मी सुद्धा नाहीये. चला जाणून घेऊया जगातले असे 11 देश ज्यांच्याकडे त्यांची आर्मी नाहीये.

1) मार्शल द्वीप

(Image Credit: www.infomarshallislands.com)

मार्शल द्वीप एक व्दीप देश आहे आणि हा देश प्रशांत महासागरात आहे. या देशाची लोकसंख्या 52,634 इतकी आहे. आणि या देशाकडे स्वत:ची आर्मी नाहीये.

2) सोलोमन आयलंड

(Image Credit: www.visitsolomons.com.sb)

सोलोमन आयलंड हा वेगवेगळ्या द्वीप समूह आहे. हा दक्षिण प्रशांत क्षेत्रात येतो. इथे पर्यटकांसाठी स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टची व्यवस्था आहे. पण इथे त्यांची आर्मी नाहीये. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील भांडणामुळे इथे कोणताही आर्मी नाहीये. 

3) पलाऊ

(Image Credit : www.tourist-destinations.com)

पलाऊ हा सुद्धा एक द्वीप आहे आणि हा द्वीपही प्रशांत महासागरात येतो. हा द्वीपही आपल्या सुंदरतेसाठी आणि स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथे केवळ 30 पोलीस आहेत पण इथे आर्मी नाहीये.

4) व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये आहे आणि त्यांच्याकडे कोणतीही आर्मी नाहीये. इटलीची सेनाच व्हॅटिकन सिटीची सुरक्षा करते. 

5) डॉमिनिका

डॉमिनिकामध्ये 1981 पासून आर्मी नाहीये. हा द्वीप देश कॅरेबियन समुद्रात आहे. हा देश आपल्या गरम पाण्याच्या झऱ्यासाठी ओळखला जातो.

6) समोआ

(Image Credit : cnn.com)

समोआमध्ये अनेक छोटे छोटे द्वीप समूह आहेत. समोआची स्वत:ची आर्मी नाहीये. पण या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी न्यूझीलंडकडे आहे. 

7) ओसियनिया

(Image Credit : www.thecoconet.tv)

ओसियनिया हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक स्वतंत्र द्वीप देश आहे. इथे पोलीस फोर्स आहे पण आर्मी नाहीये. 

8) अॅंडोरा

अॅंडोरा हा यूरोपमधील एक छोटा देश आहे. येथील लोकसंख्या केवळ 85 हजार इतकी आहे. त्यामुळे इथे आर्मी नाहीये. अॅंडोराच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेन आणि फ्रान्स देशांवर आहे. 

9) नौरु

नौरु या देशाकडे त्यांची पोलीस फोर्स आहे. पण त्यांच्याकडे आर्मी नाहीये. या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ही ऑस्ट्रेलियाकडे आहे. 
 

Web Title: Countries without their own army force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.