३३ लोकसंख्या असलेला देश
By Admin | Published: July 7, 2017 01:31 AM2017-07-07T01:31:36+5:302017-07-07T01:31:36+5:30
आमच्या देशात राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण म्हणजे सामान्य जनतेला संकटच वाटते. हे नेते कुठेही गेले तरी त्यांच्या आगेमागे वाहने, सुरक्षा यंत्रणा
आमच्या देशात राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण म्हणजे सामान्य जनतेला संकटच वाटते. हे नेते कुठेही गेले तरी त्यांच्या आगेमागे वाहने, सुरक्षा यंत्रणा फिरत असते. परंतु जगात असा एक देश आहे की त्याचे राष्ट्रपती कोणत्याही संरक्षणाशिवाय रस्त्यांवर फिरतात. या देशाची लोकसंख्या चार कुत्र्यांसह आहे फक्त तेहतीस. अमेरिकेच्या नेवाडात असलेल्या या देशाचे त्याचे स्वतंत्र कायदे, परंपरा व स्वत:चे चलन आहे. देशाचे नाव आहे मोलोशिया.
१९७७ मध्ये केविन बॉघ आणि त्याच्या मित्राच्या डोक्यात आपला स्वत:चा देश स्थापन करण्याचा विचार आला व त्या दोघांनी मोलोसियाची स्थापना केली तेव्हापासून केविन त्याचे राष्ट्रपती आहेत. त्यांनी स्वत:ला हुकूमशहा जाहीर करून टाकलेले आहे. त्यांच्या पत्नीला देशाची पहिली महिला (फर्स्ट लेडी) असा दर्जा आहे. मोलोशियात राहणारे बहुतेक लोक हे केविन यांचे नातेवाईक आहेत.
जगातील कोणत्याही देशाने अजून मोलोशियाला मान्यता दिलेली नाही. ज्या मित्रासोबत केविन यांनी देश स्थापन करण्याचा विचार केला होता त्या मित्राने लवकरच अंग काढून घेतले. परंतु केविनने आपला विचार सुरूच ठेवला. अनेक पर्यटक या देशात येतात. दोन तासांच्या या पर्यटनात स्वत: केविन त्यांना देशाच्या इमारती दाखवतात.