'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 08:13 PM2021-09-17T20:13:54+5:302021-09-17T20:15:13+5:30

सुपरमार्केटमधील माल वेळेवर पोहचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरची कमतरता भासत आहे.

In this country, truck drivers get a job with a salary of 72 lakh, find out reason | 'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण...

'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण...

Next

ब्रिटन: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात सुशिक्षित इंजीनिअर-डॉक्टरांना जितका पगार मिळत नाही, त्यापेक्षा जास्त पगार ब्रिटनमधील ट्रक ड्रायव्हरला मिळत आहे. ब्रिटनमधील मोठ-मोठ्या दुकानांमध्ये माल पुरवणाऱ्या ट्रक चालकांना वार्षिक 70,000 पाउंड (70,88,515 रुपये) पगार दिला जात आहे. एवढंच नाही तर, त्यांना 2000 पाउंड म्हणजेच सुमारे 2,02,612 रुपये बोनसदेखील दिला जातोय.

काय मिळतोय एवढा पगार ?

ब्रिटनमधील टेस्को आणि सेन्सबरी सारख्या कंपन्यांमधील ट्रक चालकांना हा भरघोस पगार दिला जातोय. याचे कारण म्हणजे ब्रिटनमध्ये ट्रक ड्रायव्हरची खूप कमतरता आहे. एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये तब्बल 100,000 चालकांची गरज आहे. यामुळेच सुपरमार्केट्सचा माल वेळेवर पोहचवण्यासाठी चालकांची भरगोस पगार दिला जातोय. ही चालकांची कमतरता भरुन न काढल्यास माल वेळेवर पोहचणार नाही आणि यामुळे मालाच्या किमतीत वाढ होऊ शकते. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ शकतो.

2 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर करावं लागेल काम
17 वर्षांपासून ट्रक चालवणाऱ्या बॅरी नावाच्या एका चालकाने दावा केलाय की, त्याला काही एजंट्सनी दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करण्यासाठी संपर्क केला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार, आठवड्यातून पाच दिवस काम आणि शनिवार-रविवार सुट्टी दिली जाईल. याशिवाय, शनिवार आणि रविवारी काम केल्यास दुप्पट भाडे आणि बोनसही दिला जाईल. 

Web Title: In this country, truck drivers get a job with a salary of 72 lakh, find out reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.