'या' देशांमध्ये घ्या श्रीमंतीचा अनुभव; 1 रुपयाची किंमत होते थेट 500 रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:15 PM2024-11-28T18:15:06+5:302024-11-28T18:15:26+5:30
Country where Indian Currency stronger: या देशांमध्ये तुम्ही अतिशय कमी खर्चात पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
Indian Rupees Value: दिवसेंदिवस महागाई प्रंचड प्रमाणात वाढतीये, घर चालवायला सामान्यांना पगार अपुरा पडतोय, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही 100 रुपये घेऊन बाजारात गेलात, त्यात तुम्ही अतिशय मोजक्या गोष्टी खरेदी करू शकता. पण, आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपल्या भारतीय रुपयाची खूप मागणी आहे. तुम्ही 100 रुपयांची नोट घेऊन या देशात गेलात, तर खूप सामान खरेदी करू शकता.
भारताचा 1 रुपया तीनशेपट वाढतो
व्हिएतनाम हा असा देश आहे, जिथे भारताचा एक रुपया 300.41 डोंग(व्हिएतनामी चलन) बनतो. याचा अर्थ, जर तुम्ही व्हिएतनामला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी बजेटमध्येच टूर करू शकता. व्हिएतनामध्ये तुम्ही अतिशय कमी खर्चात सर्वत्र फिरू शकता.
1 रुपया 500 इराणी रियाल होतो
रुपयाची ताकद बघायची असेल, तर इराणमध्ये बघा. या देशात एक रुपयाची नोट 497.94 इराणी रियाल होते. म्हणजेच, तुमच्या खिशात 100 रुपयांची नोट असेल, तर ती 49,791.51 इराणी रियालमध्ये बदलेल. पण, इराण आणि इस्रायलमधील रक्तरंजित संघर्षामुळे येथे पर्यटकांची ये-जा सध्या बंद आहे.
1 रुपया 260.51 लाओ किप होतो
लाओस हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे, जो नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगले आणि मोकळे निळे आकाशासाठी प्रसिद्ध आहे. या देशात भारतीय रुपया खूप शक्तिशाली आहे. या देशात 1 भारतीय रुपया 260.51 लाओ किपमध्ये होतो.