जगातील सर्वात मोठा बटाटा निघाला खोटा, DNA टेस्टमधुन समोर आली धक्कादायक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:57 PM2022-03-16T15:57:03+5:302022-03-16T15:59:32+5:30

आता त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आला आहे, ज्यात डगबाबबत मोठा उलगडा झाला आहे. डग हा बटाटा नाही तर दुधीच्या प्रजातीची भाजी आहे, जी जमिनीच्या आत तयार होते.

couple claims world's biggest potato but DNA test said gourd | जगातील सर्वात मोठा बटाटा निघाला खोटा, DNA टेस्टमधुन समोर आली धक्कादायक गोष्ट

जगातील सर्वात मोठा बटाटा निघाला खोटा, DNA टेस्टमधुन समोर आली धक्कादायक गोष्ट

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपूर्वी एक बटाटा सर्वाधिक चर्चेत आला होता. या बटाट्याचा आकार इतका मोठा होता की पाहून सर्वजण शॉक झाले. हा जगातील सर्वात मोठा बटाटा (World's biggest potato) असावा असा दावा करण्यात आला. याचं नामकरण झालं, त्यानंतर त्याची डीएनए टेस्टही करण्यात आली. आता त्या बटाट्याच्या डीएनए टेस्टचा (World's biggest potato DNA Test) रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा वाटणाऱ्या या बटाट्याबाबत मोठं सत्य समोर आलं आहे .

न्यूझीलँडमधील (New Zealand )  एका वृद्ध कपलने आपल्या बागेत एक अनोखा बटाटा उत्पादित केला. ज्याचं वजन तब्बल ७.७ किलो आहे. जगातील हा सर्वात मोठा बटाटा आहे, असा दावा या कपलने केला. पण याचा डीएनएन रिपोर्ट समोर येताच त्यांना धक्का बसला. कोलिन क्रॅग ब्राऊन  (Colin Craig-Brown) आणि त्यांची पत्नी डोना क्रॅग ब्राऊन (Donna Craig-Brown)  यांना आपल्या बागेत एक अनोखा बटाटा दिसला आहे. बऱ्याच परिश्रमांनी त्यांनी हा बटाटा खोदून बाहेर काढला. याचं वजन ७.८ किलोग्राम होतं.  याचा एक तुकडा खाल्ल्यानंतर हा बटाटाच आहे, हे या कपलला स्पष्ट झालं. याचं नामकरणही करण्यात आलं. डग (Dug) असं या बटाट्याचं नाव ठेवण्यात आलं. याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. इतका मोठा बटाटा पाहून सर्वजण हैराण झाले.

या कपलला बटाट्याच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी अप्लाय करण्याचा सल्ला देण्यात आला. आपल्या बागेतील बटाटा जगातील सर्वात मोठा बटाटा आहे, असा विश्वास या कपलला होता. त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी केली. ई-मेलमार्फत फोटो पाठवले. या बटाट्याचा फोटो आणि सॅम्पल पाहिल्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने याचा डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आता त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आला आहे, ज्यात डगबाबबत मोठा उलगडा झाला आहे. डग हा बटाटा नाही तर दुधीच्या प्रजातीची भाजी आहे, जी जमिनीच्या आत तयार होते. यामुळे कोलिन आणि त्यांच्या पत्नीच्या पदरी निराशा पडली आहे. सध्या जगातील सर्वात मोठा बटाटा ५ किलो वजनाचा आहे.

Web Title: couple claims world's biggest potato but DNA test said gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.