सहज गंमतीनं बापानं १२ वर्षीय पोराची DNA चाचणी केली; रिझल्ट पाहून चेहऱ्यावर घाम फुटला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:53 PM2021-08-29T19:53:48+5:302021-08-29T19:55:20+5:30
आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली
अमेरिकेच्या एका व्यक्तीनं सहज गंमत म्हणून मुलाची डीएनए(DNA) चाचणी केली. त्यानंतर जे सत्य समजलं ते ऐकून बापाला मोठा धक्काच बसला. १२ वर्षाच्या मुलाचा टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर त्या बापाला पुढे काय करायचं हे काही सुचलं नाही. आतापर्यंत मुलावर एवढा जीव लावला. प्रेमानं त्याला वाढवलं. पण गंमत म्हणून DNA चाचणी केली आणि सगळं काही धुळीस मिळालं. डीएनए चाचणीतून सगळं सत्य समोर आलं.
आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली. अमेरिकेच्या उटाह निवासी कपल डोना आणि वन्नेर जॉनसनसोबत सर्वात भयंकर किस्सा घडला आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या वन्नेर जॉनसन यांनी १२ वर्षीय मुलाचं सहज गंमतीनं डीएनए चाचणी केली. तेव्हा जॉनसनला समजलं की, तो त्याचा मुलगाच नाही. या कन्फ्यूजनचं कारण होतं IVF प्रक्रियेवेळी Fusionमध्ये झालेली चुक महागात पडली.
IVF च्या माध्यमातून डोना गर्भवती राहिली होती
डोना आणि वन्नेर जॉनसन दुसऱ्या मुलाच्या इच्छेसाठी २००७ मध्ये IVF चा आधार घेतला. IVF च्या माध्यमातून डोना गर्भवती राहिली. दोन्ही मुलांसह डोना आणि वन्नेर जॉनसन आनंदानं जीवन जगत होते. परंतु एकेदिवशी सहज गंमतीनं जॉनसन त्याच्या दुसऱ्या मुलाची DNA टेस्ट केली. डीएनए चाचणीचा निष्कर्ष बाहेर येताच वेन्नर जॉनसनचं सगळं आयुष्यच बदललं. त्याच्या चेहऱ्यावरील हास्यच गायब झालं.
क्लिनिकवर गुन्हा दाखल
रिपोर्ट बघितल्यानंतर कपलनं ज्याठिकाणी IVF प्रक्रिया पार पाडली होती त्या क्लिनिकवर गुन्हा दाखल केला आहे. Nzherald.co.nz वेबसाईटनुसार, DNA टेस्ट रिपोर्टमध्ये आईचं नाव डोना असं लिहिलं होतं आणि वडिलांच्या नावाखाली Unknown असं मेन्शन केले होते. हे पाहून दाम्पत्याला मोठा धक्का बसला. जेव्हा प्रकरणाची चौकशी केली तेव्हा कळालं की, एका फ्यूजनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. डोनाच्या एगमध्ये दुसऱ्या कुणाचे तरी स्पर्म फ्यूज करण्यात आले होते.