काहीतरी वेगळं करण्यासाठी रिसॉर्टवर गेलं कपल, पतीच्या चुकीमुळे पत्नीने गमावला जीव; ६ वर्षाची झाली शिक्षा..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:09 PM2021-05-06T16:09:59+5:302021-05-06T16:15:14+5:30
काहीतरी वेगळं करण्याच्या नादात फिरायला गेलेल्या महिलेचा पतीच्या चुकीमुळे मृत्यू झाला. त्याला आता शिक्षा सुनावली गेली आहे.
ब्रिटनमधील एक कपल सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आणि रोमांचक काही करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये थांबलं होतं. मात्र, पतीच्या नशेच्या सवयीमुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी कोर्टाने ५२ वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टनवर गंभीर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आणि त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली.
नॉर्थ वेल्स लाइवच्या रिपोर्टनुसार, मार्टिन आपली ३८ वर्षीय पत्नी क्लेअर व्हाइटसोबत एका लक्झरी लॉजमध्ये गेला होता. वॉरेन आणि क्लेअर या ट्रिपवर काही रोमांचक करण्याच्या उद्देशाने आले होते. दारू आणि ड्रग्ससोबतच या ट्रिपवर ग्ल्वज, रेड टेप, व्हाइट टेपसारख्या वस्तूही आढळल्या.
काहीतरी अॅडव्हेंचर करायचं म्हणून वॉरेनने क्लेअरला बांधलं होतं आणि तिच्या तोंडात एक सॉक्स ठेवला होता. मार्टिनने फार जास्त नशा केली होती म्हणून त्याला लगेच झोप आली होती. तेच क्लेअरची हालत खराब होऊ लागली होती. ती बांधलेली असल्याने काही करू शकली नाही आणि तिने तसाच अखेरचा श्वास घेतला. (हे पण वाचा : एक्स बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक, महिलेने सूड घेण्यासाठी प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मुलीला पाठवले!)
मात्र, हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, मार्टिनने क्लेअरच्या तोंडावर टेपही बांधला होता की नाही. मार्टिन जेव्हा सकाळी उठला तेव्हा त्याला समजलं की, क्लेअरचा मृत्यू झाला. तो मदत मागण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
द सनच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर महिलेच्या परिवाराला धक्का बसला होता. क्लेअरची आई जूली डेविस म्हणाली होती की, ती तिच्या मुलीच्या निधनानंतर मानसिक रूपाने त्रासली आहे. त्या या विचाराने चिंतेत असतात की, त्या आता कधीच आपल्या मुलीचा आवाज ऐकू शकणार नाही.