लय भारी! पार्कमध्ये साफसफाई करताना दाम्पत्याचं बदललं नशीब; कचऱ्यात सापडली 50 वर्षे 'ही' जुनी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:13 PM2022-02-21T12:13:17+5:302022-02-21T12:24:22+5:30
एका दाम्पत्याला गार्डनमधील कचरा साफ करत असताना एक अशी गोष्ट सापडली की ज्यामुळे ते मालामाल झाले आहेत.
कोणाचं नशीब कधी, कुठे अन् कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका दाम्पत्याला गार्डनमधील कचरा साफ करत असताना एक अशी गोष्ट सापडली की ज्यामुळे ते मालामाल झाले आहेत. कोणी कल्पना देखील करू शकत नाही अशी गोष्ट त्यांना या कचऱ्यात सापडली. स्वच्छता करत असताना सापडलेली वस्तू पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या शेरॉन लॉन्गहर्स्ट आणि तिचा पती अँडी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ही गोष्ट समजताच त्यांना ही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
हे दोघंही सुट्टीच्या दिवशी पार्कमध्ये साफसफाई करत होते. दरम्यान कचरा वेचत असताना त्यांना एक वेफर्सचं पाकिट सापडलं. हे पाकिट साधं नव्हतं. तर तब्बल 50 वर्ष जुनं होतं. हे पाकिट घेऊन ते घरी आले. त्यांनी या पाकिटाची चांगली सफाई केली. अन् त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खरं तर त्यांनी कौतुक म्हणून हे फोटो शेअर केले होते. परंतु काही हौशी मंडळींनी हे पाकिट विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हे वेफर्सचं पाकिट 1989 साली तयार करण्यात आलं होतं. त्याकाळातील लोक देखील वेफर्स खायचे हे पाहून दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. चिप्सचं हे पाकिट विकलं गेलं तेव्हा त्याची किंमत अगदी थोडी होती. तसंच पाकिटावर 'खरेदीदार स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि विनामूल्य फुटबॉल बॅज मिळवू शकतात,' अशी ऑफरही होती. शेरॉन आणि तिचा पती या पाकिटाला फ्रेम करण्याचा विचार करत आहेत. जेणेकरून ते म्युझियममध्ये ठेवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.