गार्डनमध्ये खोदकाम करताना सापडलं असं काही, आत गेल्यावर अवाक् झालं कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:41 PM2024-02-27T12:41:24+5:302024-02-27T12:44:08+5:30

खोदकाम करताना एका स्लॅबखाली एक भुयारी मार्ग होता. बेक्सने टिकटॉकवर सांगितलं की, त्यांनी आधी स्लॅब बाजूला करून बघितलं नव्हतं.

Couple found secret tunnel under thick slab digging up garden Britain | गार्डनमध्ये खोदकाम करताना सापडलं असं काही, आत गेल्यावर अवाक् झालं कपल

गार्डनमध्ये खोदकाम करताना सापडलं असं काही, आत गेल्यावर अवाक् झालं कपल

अनेकदा लोकांना जुन्या घरांमध्ये, घरांच्या बागेत किंवा अंगणात असं काही सापडतं जे बघून ते अवाक् होतात. कधी त्यांना खजिना सापडतो तर कधी काही अशा ऐतिहासिक वस्तू सापडतात ज्या हैराण करणाऱ्या असतात. एका कपलसोबत असंच झालं. ते त्यांच्या गार्डनचं रिनोव्हेशन करत होते तेव्हा त्यांना एका स्लॅबखाली काहीतरी अजब दिसलं. तो एक भुयार होता.

ब्रिटनमधील बेक्स नावाची एक महिला आणि तिच्या पतीला दिसलं की, खोदकाम करताना एका स्लॅबखाली एक भुयारी मार्ग होता. बेक्सने टिकटॉकवर सांगितलं की, त्यांनी आधी स्लॅब बाजूला करून बघितलं नव्हतं. पण नंतर तिच्या पतीने हिंमत करून भुयारात उतरण्याचा निर्णय घेतला. हा भुयार एक बॉम्ब शेल्टर असल्याचं त्यांना दिसलं. ते एक वेगळंच जग होतं.

जुन्या शेल्टरमध्ये गेल्यावर कपलला उंदरांची घरे, काचेच्या बॉटल आणि जुनी मातीची भांडी सापडली. बेक्स म्हणाली की, तिथे फार जुन्या वस्तू पडल्या होत्या आणि कोळीचे जाळे होते.

तिने खुलासा केला की, आम्ही याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इथे महिला आणि त्यांच्या मुलांसाठी शेल्टर होतं. काही स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं की, हे नेहमीच इथे होतं आणि एका मोठ्या स्लॅबखाली लपलं होतं. पण ते बंद करण्यात आलं होतं. 

बेक्स म्हणाली की, त्यांनी जागेचे फोटो घेण्यासाठी एका व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला. आम्ही आत लाईट लावण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी सल्ला दिला की, ही रूम कुणालातरी भाड्याने द्यावी. पण त्यांचं मत होतं की, हे एक अनोखं ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आहे जे आम्हाला बदलायचं नाही. कपलचा हा शोध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हजारो लोक यावर कमेंट करत आहेत.  

Web Title: Couple found secret tunnel under thick slab digging up garden Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.