तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 08:52 PM2018-02-08T20:52:30+5:302018-02-08T20:58:58+5:30

सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना...

Couple get married in a toilet while groom's mother is given oxygen by medical crew | तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न

तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न

googlenewsNext

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक विचित्र लग्न पार पडलं. येथे एका जोडप्यावर चक्क टॉयलेटमध्येच लग्न करण्याची वेळ आली. या घटनेमध्ये न्यायाधीशालाही टॉइलेटमध्ये जाऊन लग्न लावून द्यावं लागलं.  
टॉयलेटमध्ये लग्न करणा-या नववधूचं नाव मारिया शुलज आणि वराचं नाव ब्रायन असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान अचानक एक वेगळाच प्रसंग झाला.  ब्रायन आणि मारिया न्यू जर्सी येथील  मॉनमाउथ काउंटी कोर्ट हाउसमध्ये लग्न करण्यास पोहोचले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना ब्रायनच्या आईची प्रकृती बिघडली. टॉइलेटमध्ये असताना त्यांना अस्थमाचा अटॅक आला. आईची प्रकृती बिघडल्याचं समजताच ब्रायनने टॉइलेटमध्ये धाव घेतली. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ब्रायनच्या आईला ऑक्सिजन देण्यास सुरूवात झाली, आणि अॅम्ब्युलन्सही बोलावण्यात आली. 
उपस्थित सर्वजण चिंतेत होते, पण लग्न आजच लागावं अशीही सर्वांची मनोमन इच्छा होती. कारण तेथील नियमानुसार जर लग्न टाळलं असतं तर पुन्हा लग्नाच्या परवान्यासाठी पुढील 45 दिवस वाट पाहावी लागली असती. तसंच लग्नामध्ये आईची उपस्थिती अनिवार्य होती, कारण लग्नाच्या परवान्यावर त्यांची स्वाक्षरी होती. 
अखेर विचारपूर्वक महिलांच्या टॉयलेटमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्विधा मनःस्थितीत असलेले वधू आणि वर दोघंही तयार झाले, आई तेथेच होती, न्यायाधिशांनीही परवानगी दिली आणि अखेर टॉयलेटमध्येच हे अनोखं लग्न पार पडलं. त्यानंतर आईला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. 
या दोघांच्या या वेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  2 जानेवारीची ही घटना आहे.

Web Title: Couple get married in a toilet while groom's mother is given oxygen by medical crew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.