आकाशात उडणाऱ्या विमानात केलं लग्न, लग्नाच्या या अनोख्या उंचीचं नेटकऱ्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:49 PM2022-05-02T14:49:50+5:302022-05-02T14:50:01+5:30
एका कपलचं जगातील वेडिंग कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेगासमध्ये लग्न करण्याचं स्वप्न होतं. पण त्याचं लग्न अशा ठिकाणी झालं ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. उंच आकाशात उडता उडता या कपलने लग्नगाठ बांधली आहे (Wedding in Air).
आपलं लग्न सर्वात हटके आणि अविस्मरणीय असावं असं प्रत्येक कपलला वाटतं. त्यामुळे आपल्या लग्नात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतं. कुणी एखादं थीम ठरवून वेडिंग करतं, तर कुणी डेस्टिनेशन वेडिंग करतं. एका कपलचं जगातील वेडिंग कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेगासमध्ये लग्न करण्याचं स्वप्न होतं. पण त्याचं लग्न अशा ठिकाणी झालं ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. उंच आकाशात उडता उडता या कपलने लग्नगाठ बांधली आहे (Wedding in Air).
यूएसच्या ओक्लाहोमातील जेरेमी साल्दा आणि पाम पॅटरनसचं आपलं लग्न वेडिंग कॅपिटल वेगासला व्हावं असं स्वप्न होतं. २४ एप्रिलला ते वेगासमध्ये लग्न करणार होते. यूएस टुडेच्या रिपोर्टनुसार त्यासाठी त्यांनी चॅपेलही बुक केलं. पण त्यांच्या नशीबात दुसरंच काही होतं.
ओक्लाहोमाहून हे कपल डलास फोर्ट वर्थ (DFW) इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचले. तिथं त्यांना लासहून (LAS) त्यांचं कनेक्टिंग फ्लाइट रद्द झाल्याचं समजलं. आता आपण वेगासला वेळेत कसं पोहोचणार ही चिंता त्यांना लागून राहिली. DFW हून LAS ला प्रवास करणारा प्रवासी क्रिसने त्या दोघांचं बोलणं ऐकलं. त्यानंतर त्या तिघांनी वेगाससाठी साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या तीन ऑनलाइन सीट्स कशाबशा बुक केल्या. (Wedding in Plane).
ज्या फ्लाइट्सच्या सीट्स त्यांनी बुक केल्या त्या फ्लाइटचा कॅप्टन गिलने पाहिलं की पामने लग्नाचा ड्रेस घातला आहे. पामने त्याला आपली स्टोरीही सांगितली आणि आपल्याला आता फ्लाइटमध्येच लग्न करायला हवं, असं मजेमजेत तो गिलसमोर बोलून गेला. कॅप्टन गिलने याला गांभीर्याने घेतलं आणि 'चल करूया', असं म्हटलं. कॅप्टन गिलचे शब्द ऐकून पामही हैराण झाला.
फ्लाइटमध्ये लग्नासारखं वातावरण तयार करण्यात आलं. टॉयटल पेपरपासून बनवलेले स्ट्रीमर फ्लाइटमध्ये सजवण्यात आले. फ्लाइट अटेंडेंट जुली नवरीबाईची मेड ऑफ ऑनर बनली. फ्लाइटमध्ये प्रवास करणारा एक प्रोफेशनल फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी उभा राहिला. एका प्रवाशाने शुभेच्छांसह सही करण्यासाठी आपली एक नोटबुक दिली. जगातील मॅरेज कॅपिटल वेगासऐवजी या कपलने आकाशात हवेत ३७ हजार फूट उंचावर लग्नगाठ बांधली. या अनोख्या लग्नाची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.