लग्नात कॅटरिंगवाल्यांना दिले ५ लाख रुपये, कपलने केक कापला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:05 PM2019-01-10T12:05:25+5:302019-01-10T12:05:48+5:30
लग्न नेहमीसाठी लक्षात रहावं म्हणून लोक लाखो रुपये खर्च करतात. पण कितीही चांगलं करुनही लोक नकारात्मक चर्चा करतातच.
लग्न नेहमीसाठी लक्षात रहावं म्हणून लोक लाखो रुपये खर्च करतात. पण कितीही चांगलं करुनही लोक नकारात्मक चर्चा करतातच. पण एका वेगळ्याच कारणाने फिलिपिन्समधील एका लग्नाची चर्चा रंगली आहे. याचं सर्वात मोठं कारण आहे वेडींग केक. खरंतर लग्नातील सर्वच कामांची जबाबदारी कॅटरींगवाल्यांना दिली जाते. पण जेव्हा कॅटरींगवाले हात काढून घेतात तेव्हा कशी फजिती होते ते इथे बघायला मिळालं.
झालं असं की, फिलिपिंसच्या मनीलामधील पसिगमध्ये एका कपलने त्यांच्या लग्नासाठी कॅटरींगवाल्यांना १ लाख ४० हजार पेसो(फिलिपिंस करंसी) दिले होते. भारतीय मुद्रेत ५ लाख रुपये. पण इतके पैसे देऊनही सेवा मात्र अपुऱ्या देण्यात आल्या.
मीडिया रिपोर्टनुसार, शाइन तमायो आणि तिचा पार्टनर जॉन चेन यांना लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला. कारण वेडींग रिसेप्शननंतरही कॅटरींगवाल्यांनी जेवणाचं काहीच सप्लाय केलं नाही. अशात वेळेवर बाहेरुन एका दुकानातून नूडल्स मागवावे लागले आणि तेच पाहुण्यांना जेवायला दिले गेले.
इतकेच नाही तर या कॅटरींगवाल्यांनी पुढे कहरच केला. जेव्हा नवरा-नवरी केक कापण्यासाठी गेले तेव्हा तर कमालच झाली. दोघे आनंदाने केक कापत होते, पण केक कापलाच जात नव्हता. कारण केक थर्मॉकॉलने तयार करण्यात आला होता. हे बघून नवरी थेड रडायला लागली.
या कपलने कॅटरींग विरोधात फसवणूकीची तक्रार केली आहे. जेव्हा याबाबत नवरीला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता.