ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:17 PM2022-08-21T17:17:44+5:302022-08-21T17:33:08+5:30

सध्या जी लग्नपत्रिका समोर आली आहे, ती कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. अशीच लग्नपत्रिका बनवणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीला सर्वांनी दाद दिली आहे. अशीसुद्धा लग्नपत्रिका असू शकते, हे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Couple gets wedding card printed as tablet strip, here's how Twitter reacted | ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

googlenewsNext

आपलं लग्न सर्वांच्या लक्षात राहिल असं व्हावं यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे लग्नात काही ना काही तरी हटके करण्याचा प्रयत्न असतो. लग्नाचं कार्डही याला अपवाद नाही. एकिकडे सेलिब्रिटी, श्रीमंतांचा  सोने-चांदी-मोत्यांनी सजवलेल्या महागडे कार्ड्स सर्वांना आकर्षित करतात तर दुसरीकडे अशा महागड्या कार्ड्सचा खर्च परवडत नसला तरी काही लोक त्यांच्या सिम्पल पण युनिक कार्ड्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अशीच एक लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

तसे तुम्ही काही युनिक आणि हटक्या लग्नपत्रिका पाहिल्या असतील. कुणी आधार कार्ड, कुणी पॅन कार्ड, कुणी वोटर कार्डसारखी तर कुणी रूमालावर आपली लग्नपत्रिका छापली. पण सध्या जी लग्नपत्रिका समोर आली आहे, ती कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. अशीच लग्नपत्रिका बनवणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीला सर्वांनी दाद दिली आहे. अशीसुद्धा लग्नपत्रिका असू शकते, हे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.


हे वाचा - ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नाहीत म्हणून भडकली नवरीबाई; रागात उचललं धक्कादायक पाऊल

ही लग्नपत्रिका म्हणजे औषधांची स्ट्रिप म्हणजे औषधांचं पाकिट आहे. सुरुवातीला पाहताच तुम्हाला हे मेडिसीनचं पॅकेट वाटेल पण नीट पाहिलं आणि त्यातील मजकूर तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल ही एक लग्नपत्रिका आहे.

ज्यात या व्यक्तीने आपलं आणि आपल्या होणाऱ्या बायकोचं नाव, लग्नाची तारीख, स्थळ, जेवणाची वेळ आणि इतर कार्यक्रमांचाही उल्लेख केला आहे. कार्डमधील माहितीनुसार ही व्यक्त तामिळनाडूतील आहे आणि ती फार्मेसी क्षेत्राशी संबंधित आहे. जिने टॅबलेट शीटच्या रूपात आपली लग्नपत्रिका बनवली आहे.

@DpHegde ट्विटर अकाऊंटवर ही लग्नपत्रिका पोस्ट करण्यात आली आहे. चुकून टॅबलेट समजू नका, हे लग्नाचं आमंत्रण आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.  हे अनोखं कार्ड पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. 'हे पाहून कुणीही फसेल', 'मला वाटलं लग्नाच्या कार्डमध्ये औषध देऊन आला', 'पाहुण्यांचं डोकं चक्रावेल', अशा बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी या क्रिएटिव्हटीचं कौतुक केलं आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

 

Web Title: Couple gets wedding card printed as tablet strip, here's how Twitter reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.