12 महिन्यांपासून हनीमूनवर आहे हे कपल, पुढील 9 वर्षही तेच करण्याच्या आहे त्यांचा प्लान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:43 PM2022-09-07T16:43:40+5:302022-09-07T16:45:21+5:30
31 वर्षीय सिल्के मुयस आणि 29 वर्षीय कीरन शॅननची भेट 2019 मध्ये स्पेनमध्ये झाली होती. लवकरच दोघेही प्रेमात पडले. 2021 मध्ये दोघांनी स्कॉटलॅंडमध्ये लग्नही केलं.
लग्नानंतर एका कपलने तब्बल 10 वर्षे हनीमून करण्याचा प्लान केला आहे. कपलने गेल्या 1 वर्षांपेक्षा जास्त काळ वेगवेगळ्या देशांमध्ये घालवला आहे. खास बाब ही आहे की, या ट्रिप दरम्यान ते रोज केवळ 640 रूपयेच खर्च करतात. हे पैसेही त्यांनी त्यांचे फोटो विकून कमावले आहेत.
31 वर्षीय सिल्के मुयस आणि 29 वर्षीय कीरन शॅननची भेट 2019 मध्ये स्पेनमध्ये झाली होती. लवकरच दोघेही प्रेमात पडले. 2021 मध्ये दोघांनी स्कॉटलॅंडमध्ये लग्नही केलं. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. आश्चर्याची बाब म्हणजे कपल 1 वर्षापासून हनीमूनवर आहे आणि पुढेही त्यांना काही वर्ष हेच करायचं आहे.
या कपलला एकत्र जगभर फिरणं फार आवडतं. त्यामुळेच त्यांनी पुढील 9 वर्ष एकत्र असंच वेगवेगळ्या देशात फिरण्याचा प्लान केला आहे. असं करण्यासाठी त्यांना त्यांचा रोजचा खर्च केवळ 640 रूपये इतका लिमिटेड ठेवावा लागेल.
गेल्या एका वर्षात कपल आइसलॅंड, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये फिरले. श्रीलंकेत तर त्यांनी 3 महिने स्टे केला. त्यानंतर कपल भारतात, नेपाळ आणि थायलॅंडमध्येही राहीलं. सिल्के आणि शॅनन दोघेही डान्सर आहेत. पण लग्नानंतर दोघेही जगाच्या सफरीवर निघाले आहेत. यादरम्यान ते कमीत कमी खर्च करतात.
कपलने सांगितलं की, ते त्यांचे फोटो विकून महिन्याला साधारण 32 हजार रूपये कमावतात. शॅनन स्कॉटलॅंडची तर मुयस बेल्जिअमचा राहणारा आहे. शॅनन म्हणाली की, लग्नानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता की, त्यांना जगाची सैर करायची आहे. पुढील 10 वर्षे आम्ही असंच फिरणार आहोत. हाच आमचा हनीमून असेल.
कपलने सांगितलं की, हे लोक पैशांसाठी कधी कधी हॉटेल्समध्ये म्युझिक वाजवतात. कधी कधी स्पॉन्सर्ड इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यामातून त्यांना चांगल्या हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळते.
कपलने हे मान्य केलं की, त्यांचं जीवन नेहमीच ग्लॅमरस पद्धतीचं नसतं. त्यांनी सांगितलं की, कधी कधी हॉटेल्स आणि प्रवासाची कंडिशन फारच बेकार असते. पण त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. शॅनन म्हणाली की, ही ट्रिप स्वप्न सत्यात उतरण्यासारखी आहे. आमची इच्छा आहे की, इतर लोकांनीही असा प्रवास करावा.