बाप रे बाप! घरी आलं 11 लाखांचं गॅस बिल; कपलच्या पायाखालची जमीन सरकली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 05:05 PM2023-10-29T17:05:16+5:302023-10-29T17:05:27+5:30
जर गॅसचं बिल दोन, तीन हजार नाही तर लाखोंमध्ये असेल तर काय होईल याची कल्पना करा. हे बिल पाहून मोठा धक्का बसेल आणि पायाखालची जमीनच सरकली असेल.
घरांमध्ये अनेकदा वीज किंवा गॅसचे बिल जास्त आलं की सर्वसामान्यांची चिंता वाढते. अशातच जर गॅसचं बिल दोन, तीन हजार नाही तर लाखोंमध्ये असेल तर काय होईल याची कल्पना करा. हे बिल पाहून मोठा धक्का बसेल आणि पायाखालची जमीनच सरकली असेल. असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासोबत घडला आहे. याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
युनायटेड किंगडममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे, जिथे 44 वर्षीय ली हेन्स आणि तिचा 45 वर्षीय पार्टनर वुडली यांना 11 लाख रुपयांचे बिल आल्याचे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या घरात गेल्या 18 वर्षांत जितका गॅस वापरला गेला असं सांगण्यात येत आहे. या जोडप्याने दावा केला आहे की, याआधी त्यांनी 2005 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा किंवा वापर करण्यामागील कारणे शोधण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता.
या जोडप्याला आता 10,824.87 पाऊंड म्हणजेच जवळपास 10,88,883 रुपयांच्या मोठ्या बिलाचा सामना करावा लागला. मेट्रो न्यूजनुसार, जेव्हा हे जोडपे 2005 मध्ये त्यांच्या घरात गेले तेव्हा त्यांनी लगेच घराची सर्व बिले भरण्याचा प्रयत्न केला परंतु येथे कोणती एजन्सी गॅस पुरवत आहे हे कळू शकले नाही. नॅशनल ग्रीड आणि त्यांच्या हाऊसिंग असोसिएशनचे 2006 चे पत्र त्यांच्या संघर्षाची पुष्टी करतं.
शाळेच्या साइटचे कर्मचारी ली म्हणाले, हे अविश्वसनीय आहे. याविषयीची माझी भीती आता खरी ठरली आहे. हे खूप विचित्र होते. काही महिन्यांनंतर आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची बिले होती, परंतु गॅसची नाहीत. मला अचानक प्रचंड बिल आल्याने काळजी वाटू लागली, त्यामुळे आमचा गॅस कोण पुरवत आहे हे जाणून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला.
गॅस बिल व्हायरल
हाऊसिंग असोसिएशनच्या व्यक्तीने ते काम करत असलेल्या सर्व पुरवठादारांशी संपर्क साधला आणि सांगितलं की, त्यांना काय करावं हे माहीत नाही. मार्चमध्ये गॅस वितरक कॅडेंटकडून त्यांच्या मालमत्तेची तपासणी करण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्यावर या जोडप्याला धक्का बसला. तीन महिन्यांनंतर, कॅडेंटने त्यांना 10,824.87 पाउंडचं बिल पाठवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.