फक्त ४० हजार रुपयांत कियाराने उरकलं लग्न, ड्रेसही फक्त ३ हजार ५०० रुपयाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:53 PM2022-04-21T18:53:34+5:302022-04-21T18:53:44+5:30
एका कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या कपलने अवघ्या ४० हजारांच्या आतच आपलं लग्न उरकलं आहे. अगदी लग्नाच्या ड्रेसपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंत सर्वकाही यामध्येच नीटपणे पार पडलं (Budget friendly wedding tips).
लग्न म्हटलं की त्याचा खर्च लाखात असतो. कुणी काही हजारात अगदी व्यवस्थितपणे लग्नसोहळा आटोपला असं सांगितलं तर साहजिकच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण अशाच एका कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या कपलने अवघ्या ४० हजारांच्या आतच आपलं लग्न उरकलं आहे. अगदी लग्नाच्या ड्रेसपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंत सर्वकाही यामध्येच नीटपणे पार पडलं (Budget friendly wedding tips).
लॉस एंजिल्समधील कियारा आणि जोएल ब्रोकनब्रू या कपलच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करणं त्यांना पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी कमीत कमी पैशातही चांगलं कसं काय करता येईल यावर जोर दिला आणि त्यांच्या लग्नाला फक्त ३८ हजार रुपये लागले.
आता त्यांनी काही हजारात लग्न कसं काय केलं, हा सर्वांना पडलेला प्रश्न. आता लग्नात सर्वात पहिलं समोर येतं ते म्हणजे लग्नाचा ड्रेस. जो खासकरून नवरीसाठी खूप स्पेशल असतो. आपला ड्रेस सर्वांपेक्षा वेगळा असावा याकडे नवरीबाईचा कल असतो. त्यासाठी मोठ्या दुकानांमध्ये जाऊन लग्नाच्या कपड्यांची खरेदी केली जाते किंवा स्पेशल ड्रेस बनवून घेतला जातो. पण कियाराने आपल्या लग्नाचा ज्रेस ऑनलाइन खरेदी केला. फक्त ३ हजार ५०० रुपयांचा वेडिंग ड्रेस तिने मागवला. कारण लग्नाचे काही तासच हा ड्रेस घालणार असल्याने या ड्रेसवर जास्त पैसे तिला खर्च करण्याची गरज वाटली नाही. तिने या ड्रेसचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरही शेअर केला जो लोकांना खूप आवडला.
रिपोर्टनुसार त्यांनी आपल्या लग्नात मोजक्याच लोकांना बोलावलं. म्हणजे काही पाहुणे आणि जवळचे मित्रमैत्रिणी नातेवाईक असे मिळून ७५ पेक्षाही कमी पाहुण्यांना त्यांनी आपल्या लग्नाचं आमंत्रण दिलं. शिवाय आवश्यक त्या गोष्टी पुरवण्यात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची मदत केली.
वायफळ खर्च न करता अगदी मर्यादित मार्गाने लग्न करण्याची कपलची ही आयडिया लोकांना खूप आवडली आहे. बहुतेकांनी या कपलचं कौतुक केलं आहे. असं लग्न सर्वांनी करायला हवं अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.