अरे देवा! नवऱ्यासोबत हनिमूनला गेली महिला; हॉटेलमध्ये पोहोचताच झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 07:48 PM2022-12-27T19:48:43+5:302022-12-27T19:51:52+5:30
सोशल मीडियावर ही घटना जोरदार व्हायरल होत आहे.
जगभरातील बरेच लोक त्यांच्या कुटुंबासह, फिरायला जातात. नवीन लग्न झालेले लोक जोडीदारासह हनीमून साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. तर काही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत देखील फिरायला जातात. लोक आपल्याला फिरायला जाण्यासाठी एक डेस्टिनेशन ठरवतात. पण अनेकदा तिथे गेल्यावर भलत्याच गोष्टी घडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
फिरायला गेलेल्या एका जोडप्याची फसवणूक झाली आहे. त्यांना हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर लगेचच बाहेर यावे लागले. सोशल मीडियावर ही घटना जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना ब्रिटनमधील एका जोडप्यासोबत घडली आहे. त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी तुर्कीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी लग्नाच्या वेळीच तुर्कस्तानचा प्लॅन केला होता आणि त्याच वेळी त्यांनी तेथे जाण्यासाठी तयारी देखील केली.
हॉटेल बुक करण्याआधी त्यांनी जेव्हा हॉटेलची चौकशी केली तेव्हा तिथल्या चित्रांमध्ये ते अतिशय हिरवेगार आणि आलिशान हॉटेल असल्याचे दिसले. तेव्हा त्यांना ही आनंद झाला आणि त्यांनी ते हॉटेल बुक देखील केलं. इतकंच नाही तर हॉटेल बुक केल्यावर तुर्कस्तानला पोहोचले. दोघेही हॉटेलवर पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची खूप मोठी फसवणूक झाली आहे.
खरंतर हे हॉटेल अतिशय छोटं आणि खराब हॉटेल होते, जे ओसाड जमिनीवर बांधले होते. तेथे काही सुख-सोयी देखील करण्यात आलेली नव्हती. याबाबत त्यांनी हॉटेल प्रशासकाला विचारणा केली असता. हॉटेलच्या प्रशासकाने तो फक्त त्याचे काम करत असल्याचे सांगत त्यांना उत्तर दिलं. पुढे त्यांनी सांगितलं जे आहे ते तुमच्यासमोर आहे. आता बाकी तुमच्यासोबत काय घडलं, याचं उत्तर फक्त हॉटेलटे मालकच देऊ शकतात.
दोघेही जेव्हा आपल्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिले की, आपण फोटोमध्ये पाहिलेल्या गोष्टींपैकी यामध्ये असं काहीच नाही. यानंतर ती महिला खूप दुःखी झाली. ज्यानंतर ते दोघेही तेथून पुन्हा घरी निघाले. त्यांच्यासोबत घडलेला हा किस्सा जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"