Covid 19: “होय, मी कोविड आहे, पण व्हायरस नाही”; कोरोनामुळं युवकाच्या आयुष्याला कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:47 PM2022-02-09T13:47:23+5:302022-02-09T13:48:44+5:30
कोविड व्हायरसमुळे आता हे नाव कायम चर्चेत राहणार आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात याचा सामना करणं इतकं सोप्पं नव्हतं.
बंगळुरु – गेल्या २ वर्षापासून सर्वसामान्यांच्या मनात एका शब्दाची प्रचंड दहशत आहे. बरोबर ओळखलं, हा शब्द आहे कोविड,(Covid-19) कोरोना महामारीमुळे जगातील बहुतांश देशात लोकांच्या राहणीमानात बदल झाला. मास्क घालणे, सॅनिटायझेशन करणं यासारख्या गोष्टी नित्यनियमाच्या बनल्या. परंतु तुम्ही विचार करा जर ३१ वर्षापूर्वी एखाद्याचं नाव कोविड कपूर(Kovid Kapoor) ठेवलं असेल आणि कोविड १९ महामारीमुळे आता तेच नाव अजब वाटायला लागू शकतं.
बंगळुरुतील कोविड कपूर यांना योगायोगानं जगातील सर्वात वेगळं नाव मिळालं. कॉफी शॉपमध्ये जेव्हा कोविड यांना हाक मारली जाते तेव्हा प्रत्येक जण हैराण होतो. कोविड कपूर यांनी नावावरुन होणाऱ्या त्रासाबद्दल माध्यमांसमोर खुलासा केला आहे. मागील २ वर्षापासून कोविड नावामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. बंगळुरुतील कोविड कपूर सांगतात की, त्यांचे नाव ऐकताच लोकं चक्रावतात. परंतु हे नाव इतकंही खराब नाही असं त्यांनी सांगितले.
कोविड व्हायरसमुळे आता हे नाव कायम चर्चेत राहणार आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात याचा सामना करणं इतकं सोप्पं नव्हतं. पहिल्यांदाच त्यांच्या नावाबद्दल सार्वजनिक ठिकाणी उडवण्यात येणाऱ्या खिल्लीमुळे त्यांना धक्का बसला. एका टॅव्हल एजन्सीचे मालक असलेले ३१ वर्षीय कोविड कपूर यांना मागील २ वर्ष खूप त्रास सहन करावा लागत आहे. WHO नं जेव्हा या महामारीचं अधिकृत नाव जाहीर केले. तेव्हा कोविड १९ आणि कोविड कपूर हे जुळत होतं. परंतु कोविड कपूर आता यासाठी काहीच करु शकत नाहीत. परंतु नावाच्या साधर्म्यामुळे त्यांना नाहक फटका बसला.
कोविड कपूर म्हणाले की, जेव्हा २०१९ च्या अखेरीच पहिल्यांदा कोरोना व्हायरसबाबत जगासमोर खुलासा झाला. तेव्हा त्यांच्या मित्रांपासून कुटुंबीयांपर्यंत सगळ्यांनी यावर जोक्स, मीम्स बनवले. परंतु हे इतक्यावर थांबले नाही तर सार्वजनिक ठिकाणीही त्यांना मान खाली घालावी लागली. कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये नावाने हाक मारली तर दुसरे ग्राहक रागाने कोविड यांच्याकडे पाहायचे. कधीकधी मित्रच सार्वजनिक ठिकाणी माझं नावं जोरजोराने घ्यायचे. परंतु काही लोकं याकडे गमंतीने पाहतात असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेकांना असं वाटतं की हे नाव खोटं आहे. मागील ३० व्या वाढदिवशी मित्रांनी माझ्यासाठी केक मागवला तेव्हा कोविड कपूर असं नाव सांगितले. तेव्हा बेकरवाल्यांना कदाचित चुकीचं नाव असल्यानं Kovid ऐवजी Covid असं लिहिलं. गेल्या २ वर्षातील अनेक छोट्या छोट्या आठवणींचा किस्सा कोविड कपूर यांच्याकडे आहे. नेहमी एअरपोर्ट आणि हॉटेलमध्ये नावावरुन त्यांना लोकांच्या चिडवण्याचा सामना करावा लागतो असंही कोविड कपूर म्हणाले.