या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:11 PM2024-03-06T15:11:36+5:302024-03-06T15:11:45+5:30
Covid vaccination : या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती किती वाढली, जाणून घ्या...
Covid vaccine dose : कोरोना महामारीदरम्यान शास्त्रज्ञांनी विषाणूपासून बचाव करणारी लस आणली. जगभरातील लोकांनी कोरोना लसीचे डोस घेतले. काहींनी दोन तर काहींनी तीन डोस घेतले. मात्र, आता एका जर्मन व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने कोरोना लसीचे 200 हून अधिक डोस घेतले आहेत. ही व्यक्ती आता शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय बनली आहे. या व्यक्तीची प्रतिकारशक्ती तपासली जात आहेत. याबाबत लॅन्सेट इंफेक्शियस डिसीज जर्नलमध्ये एक रिपोर्टही प्रसिद्ध झाली आहे.
फ्रेडरिक-अलेक्झांडर-युनिव्हर्सिटी आणि व्हिएन्ना येथील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना स्थानिक वृत्तपत्रांमधून त्या माणसाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी या जर्मन व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला चाचणीसाठी बोलावले. चाचणी आणि संशोधनसाठी तो व्यक्तीही तयार झाला.
इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी-क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, इम्युनोलॉजी अँड हायजीनचे संचालक प्रोफेसर डॉ. ख्रिश्चन बोगदान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या व्यक्तीच्या केसबद्दल वृत्तपत्रातील लेखांद्वारे कळले. मग या 63 वर्षीय व्यक्तीशी संपर्क साधला गेला आणि त्याच्यावर विविध चाचण्या आणि संशोधन करण्यासाठी बोलावण्यात आले. इतक्या लसी घेतल्यानंतर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कशी काम करते, हे पाहण्यासाठी या व्यक्तीवर संशोधन करण्यात आले.
शास्त्रज्ञांच्या मते आतापर्यंतच्या संशोधनात हे सिद्ध झालेले नाही की, त्या व्यक्तीने 200 पेक्षा जास्त लसी घेतल्या आहेत. पण त्याने नक्कीच इतरांपेक्षा खूप जास्त लस घेतल्या आहेत. या संशोधनाच्या परिणामांवरुन असे दिसून आले की, या व्यक्तीमध्ये कोव्हिड विरूद्ध टी-सेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्या शरीरात सैनिकाप्रमाणे काम करतात आणि व्हायरसशी लढतात. या व्यक्तीची तुलना तीन लसी घेतलेल्या लोकांशी केली. यात असे दिसून आले की, दोन्ही व्यक्तींची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सारखीच आहे.