OMG! गाईने दिला दोन तोंडे, सहा पाय आणि दोन शेपट्या असलेल्या वासराला जन्म, वेंगुर्ल्यात निसर्गाचा अद्भुत चमत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 06:02 PM2017-09-28T18:02:30+5:302017-09-28T18:09:53+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक अदभुत असा चत्मकार घडला. वेंगुर्ले मठ येथील किशन धुरी यांच्या गायीने चक्क दोन तोंडासह सहा पाय व दोन शेपटी असलेल्या वासरला जन्म दिला.
- अनंत जाधव
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक अदभुत असा चत्मकार घडला. वेंगुर्ले मठ येथील किशन धुरी यांच्या गायीने चक्क दोन तोंडासह सहा पाय व दोन शेपटी असलेल्या वासरला जन्म दिला. मात्र काही क्षणातच हे वासरू मृत पावले, पण जन्मदाती गाय सुखरूप आहे. हा काहीतरी अदभूत चत्मकारच असल्याने वेंगुर्ले सह परिसरातील ग्रामस्थांनी या वासराची विधिवत पूजा केली. या वासराच्या दर्शनासाठी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी झाली होती.
वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील किशन धुरी यांचे धुरीवाडा येथे घर आहे. घराच्या बाजूलाच असलेल्या गोठ्यात गाय बांधली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गाय मोठ मोठ्याने हंबरडा फोडत होती. त्याचवेळी या गायीने एका वासराला जन्म दिला. पण हे वसरू बघून किशन धुरी यांच्यासह त्यांचे कुटुंब हादरून गेले. जन्म झालेल्या वासराला चक्क दोन तोंड होती. तसेच सहा पाय व दोन शेपट्याही होत्या. हा प्रकार काय? हे पहिले काही धुरी कुंटूबियांना सुचत नव्हते .मात्र या वासराचा काही वेळेतच मृत्यू झाला.
पण गाय सुखरूप आहे. गायीने जन्म दिलेल्या वासराला दोन तोंड सहा पाय व दोन शेपट्या ही बातमी पूर्ण वेंगुर्ले तालुक्यात पसरू लागली. सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. त्यामुळे अनेकांनी धुरी यांच्या धुरीवाड्यातील घरी धाव घेतली. काहींनी तर गुरूवार असल्याने दत्त अवतरला तर कोणी नवरात्रीत देवीचे रूप जन्मास आले असे सांगितले. मात्र या मृत वासराची विधीवत पूजा केली अनेकांनी धुरी यांच्या घरी धाव घेऊन या वासराची पूजा केली धुरी यांनी या वासरा बाबतची माहीती पोलिसांना दिली पोलिसांनी ही धुरी यांच्या घरी भेट दिली. पण वनविभाग तसेच महसूलच्या कोणत्याही अधिकाºयांने भेट दिली नाही.