स्वत:ची हाडं मोडून घेण्याचा सुरू आहे अजब ट्रेंड, उंचीवरून झाडावर उड्या मारत आहे लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:04 PM2022-05-23T15:04:28+5:302022-05-23T15:06:23+5:30
Mushary Trend : ही जीवघेणी क्रेज तरूणांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोकांनी यासाठी प्रॉपर एक ग्रुप बनवून झाडांवर उड्या मारण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियाचं (Social Media Trend) जग हे किती वेगळं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोक असे काही ट्रेंड चालवतात जे मनुष्यांचा जीव धोक्यात टाकणारे असतात. सध्या एक असाच ट्रेंड सुरू आहे ज्याला Mushary Trend नाव देण्यात आलं आहे. यात लोक उंचावर उभे राहून झाडांवर उड्या मारत आहेत.
ही जीवघेणी क्रेज तरूणांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोकांनी यासाठी प्रॉपर एक ग्रुप बनवून झाडांवर उड्या मारण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. इतकंच नाही तर हे लोक हेही सांगतात की, या अॅडव्हेंचरमध्ये त्यांना किती जखमा झाल्या. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हे विचित्र काही करण्याच्या नादात लोक आपली हाडंही मोडून घेत आहेत.
तुम्ही याआधीही सोशल मीडियावर अनेक ट्रेंड पाहिले असतील. जसे की, आइस बकेट चॅंलेंज ट्रेंड, पायाने बॉटलचं झाकणं उघडण्याचा ट्रेंड, चालत्या कारमधून उतरून डान्स करण्याचा ड्रेंड इत्यादी. आता सध्या मुशरी चॅलेंडची चर्चा आहे. यात व्यक्तीला एका निश्चित उंचीवर जाऊन उभं रहावं लागलं आणि तिथून खाली असलेल्या झाडांवर उडी मारावी लागते. यावेळी त्यांनी बॉयलर सूट घातलेला असतो. वाइसच्या रिपोर्टनुसार, या लोकांचं मत आहे की, ते हे मजा आणि हसण्यासाठी करतात. यातील अनेक लोकांची हाडे मोडली आहेत.
डेली स्टार च्या रिपोर्टनुसार, या ट्रेंडची मुळं फ्रान्समध्ये आहेत. लोकांनी एकेकाळी अमेरिकेच्या विरोधात उडी मारण्याचा सिलसिला सुरू केला होता. पण आता पुन्हा एकदा काही लोकांनी याला ट्रेंड बनवल आहे. त्यांनी फेसबुकवर साधारण ३०० लोकांचा एक ग्रुप बनवला आहे. ज्यात बॉयलर सूट घालून लोक झाडांवर उडी मारताना दिसत आहे आणि आपला व्हिडीओ पोस्ट करत आहेत. इतकंच नाही तर ग्रुपमध्ये उडी मारण्याच्या जागेबाबत सल्लाही दिला जातो. यात ब्रिटनची काही मुलंही सहभागी आहेत.