जिंकलेल्या लॉटरीच्या पैशातून ‘त्यानं’ आजमावलं नशीब; एका झटक्यातच कोट्यधीश बनला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:24 PM2021-08-05T15:24:43+5:302021-08-05T15:25:06+5:30
उत्तर कॅरोलिनामध्ये त्या व्यक्तीने ५० डॉलरची लॉटरी जिंकणं भाग्यवान सुरुवात होती. मात्र परंतु त्या व्यक्तीने हीच रक्कम दुसरी लॉटरी खरेदी करण्यासाठी लावली.
माणसाचं नशिब कधी बदलेल सांगता येत नाही. असाच काही प्रकार अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना एका व्यक्तीसोबत घडला आहे. पहिल्यांदा या व्यक्तीने ५० डॉलरची लॉटरी जिंकली म्हणजे भारतीय चलनात ३ हजार ७१० रुपये. तर दुसरी लॉटरी खरेदी केल्यानंतर त्याला थेट जॅकपॉट लागला. काही क्षणातच तो कोट्यधीश बनला. या व्यक्तीने २ लाख डॉलर म्हणजे १ कोटी ४८ लाख ४१ हजार ५६० रुपये लॉटरीत जिंकले आहेत.
उत्तर कॅरोलिनामध्ये त्या व्यक्तीने ५० डॉलरची लॉटरी जिंकणं भाग्यवान सुरुवात होती. मात्र परंतु त्या व्यक्तीने हीच रक्कम दुसरी लॉटरी खरेदी करण्यासाठी लावली. रिस्क घेऊन संबंधितांने आणखी एक तिकीट खरेदी केले. दुसरी लॉटरी लागेल की नाही याची खात्री नसताना जिंकलेली रक्कम त्याने पणाला लावली. मात्र त्याचे नशिब पुन्हा उजळलं त्याला २ लाख डॉलरचा जॅकपॉट लागल्याने काही क्षणातच तो कोट्यधीश झाला.
लॉटरी जिंकलेल्या या भाग्यवान व्यक्तीच नाव डेरेक स्मिथ आहे. त्याने नॉर्थ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की, तो ५० डॉलर जिंकलेल्या लॉटरीचं पैसे घेण्यासाठी आला होता. मात्र याठिकाणी त्यांनी पुन्हा एक तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. स्क्रॅच ऑफ तिकीट खरेदी केलं. त्यानंतर घरी नाश्ता करताना त्यांना फोन आला तुम्हाला लॉटरी लागली आहे. सुरुवातीला किती रक्कम जिंकली आहे याचा खुलासा केला नाही. जेव्हा तिकीट स्क्रॅच केले तेव्हा लकी नंबर मिळाला. जसा रक्कमेचा खुलासा केला स्मिथचा आनंद गगनात मावेनासा झाला. इतकी मोठी रक्कम जिंकल्याचं कळताच साफसफाई करणाऱ्या माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. या पैशातून खूप काम करणार असून एक रक्कम फिक्स्ड बँकेत ठेवणार आहे. त्यानंतर जे काही वाचेल ते माझ्या मुलांना नातवंडांना देणार आहे.