आश्चर्य! कावळेही घेतात सूड, जर मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष चेहरा ठेवतात लक्षात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:14 PM2024-11-04T13:14:03+5:302024-11-04T13:14:54+5:30
एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, एखादा प्राणी किंवा पक्ष्याला मनुष्यांनी त्रास दिला तर ते प्राणी किंवा पक्षी त्या व्यक्तीचा सूड घेतात. याबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. तर काही लोकांचा यावर विश्वास नाही. मात्र, एका वैज्ञानिकाने असा दावा केलाय ज्याबाबत वाचून तुम्ही थक्क व्हाल. एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात.
'डेली स्टार'च्या एका वृत्तानुसार, कावळेही सूड घेतात. हा दावा बर्ड्स एक्सपर्टने केला आहे. त्यांचं मत आहे की, जर कावळ्याचं वैर मनुष्यासोबत झालं तर ते साधारण १७ वर्ष लक्षात ठेवतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करत राहतात. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे प्रोफेसर जॉन मारजलुफ एक एन्वायरोमेंटल सायंटिस्ट आहेत.
कावळेही घेतात सूड
२००६ मध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. ज्याद्वारे टेस्ट करण्यात आलं की, कावळेही सूड घेतात का? त्यांना एक मास्क चेहऱ्यावर लावला आणि मग ७ कावळ्यांना एका जाळ्यात अडकवलं. पक्ष्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना बॅंड बांधण्यात आले होते. काही वेळाने त्यांनी कावळ्यांना काहीच इजा न करता सोडून दिलं. जॉनने दावा केला की, सोडून दिल्यानंतरही कावळ्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. जेव्हाही ते मास्क लावून यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून निघत होते, तेव्हा कावळे त्यांच्यावर हल्ला करत होते.
१७ वर्ष कावळ्यांनी ठेवलं लक्षात
त्यांना रिसर्चमध्ये आढळून आलं की, पक्ष्यांच्या मेंदुमध्येही एक असा भाग असतो स्तनधारींच्या एमिगडाला सोबत मिळता जुळता असतो. एमिगडाला मेंदुचा असा भाग असतो जो इमोशन्सची प्रोसेस करतो. त्यांना आश्चर्य याचं वाटलं की, पक्षी मनुष्यांच्या छोट्या छोट्या वागण्यांकडेही लक्ष देतात. इतकंच नाही तर ते चेहरेही लक्षात ठेवतात. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे कावळ्यांच्या त्या थव्यामधील इतर कावळेही त्यांच्यावर हल्ला करू लागले होते. हे साधारण ७ वर्ष असंच चाललं.
२०१३ नंतर कावळ्यांची हिंसा कमी होत गेली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा ते फिरायला निघाले तेव्हा या घटनेला १७ वर्षे झाले होते. तेव्हा पहिल्यांदा असं झालं की, ते मास्क घालून असूनही कावळ्यांनी त्यांना बघून ना आवाज केला ना त्यांच्यावर हल्ला केला. आता प्रोफेसर जॉन त्यांचा शोध प्रकाशित करण्याचा प्लान करत आहेत.