रडा आणि सुदृढ राहा
By admin | Published: July 7, 2017 01:36 AM2017-07-07T01:36:17+5:302017-07-07T01:36:17+5:30
शेकडो लोक मैदानात जमून जोरजोरात हसत आहेत, असं चित्र त्यामुळे अनेक ठिकाणी दिसत असतं. पण मनातलं दु:ख, तणाव, शोक वा
शेकडो लोक मैदानात जमून जोरजोरात हसत आहेत, असं चित्र त्यामुळे अनेक ठिकाणी दिसत असतं. पण मनातलं दु:ख, तणाव, शोक वा मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचा रडणं हाच एक मार्ग आहे. पण अनेकांना घरात रडणं शक्य होत नाही.
घरात रडल्यास इतरही दु:खी होतात आणि त्यांचा तणाव वाढू शकतो. त्यामुळे मनातलं दु:ख बाहेर काढण्यासाठी क्राइंग क्लब (रडण्यासाठी क्लब) सुरतमध्ये सुरू झाला आहे.
तिथे तुम्ही या, रडा आणि मनातलं दु:ख दूर करून निघून जा, अशी त्यामागील कल्पना आहे. गंमत म्हणजे लाफ्टर थेरपिस्ट असलेल्या कमलेश मसालावाला यांनीच हा क्लब सुरू केला आहे. बाळ जन्माला येताच रडलं, तर ते सुदृढ आहे, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे रडाल तर आरोग्य चांगलं राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी सुरतमधील या क्लबमध्ये अनेक जण जमतात आणि रडून मन मोकळं करतात. महिनाभराचं दु:ख दूर करण्यासाठी शेवटचा रविवार निवडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्य नीट ठेवण्यासाठी अनेक जण हेल्थ क्लबमध्ये जात असतात. हसण्यामुळे आरोग्य चांगलं राहते, या संकल्पनेतून भारतासह अनेक देशांमध्ये हास्य क्लब (लाफ्टर क्लब) सुरू झाले.