Cursed Movie: 'या' चित्रपटाच्या कथेला मिळाला शाप; स्टोरी वाचून 6 जणांचा संशयास्पद मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:47 PM2022-11-06T14:47:48+5:302022-11-06T14:48:25+5:30

Haunted Story: तुम्ही आतापर्यंत अनेक भीतीदायक गोष्टी ऐकल्या असतील. पण, ही एक सत्य घटना आहे. वाचा नेमकं काय झालं...

Cursed Movie: The story of this movie got cursed; Suspicious death of 6 people after reading story... | Cursed Movie: 'या' चित्रपटाच्या कथेला मिळाला शाप; स्टोरी वाचून 6 जणांचा संशयास्पद मृत्यू...

Cursed Movie: 'या' चित्रपटाच्या कथेला मिळाला शाप; स्टोरी वाचून 6 जणांचा संशयास्पद मृत्यू...

googlenewsNext

Atuk Horror Movie: काही चित्रपट अभिनेत्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, काही त्यातील गाण्यांसाठी, तर काही कथेसाठी लक्षात राहतात. पण आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो त्याच्या शापित कथेमुळे ओळखला जातो. 'अटुक' (Atuk)असे या चित्रपटाचे नाव असून, हा हॉलिवूडचा असा चित्रपट आहे, जो कधीही तयार झाला नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या चित्रपटात नायकाची भूमिका करण्यासाठी ज्या अभिनेत्याने स्क्रिप्ट वाचली, त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. तुमचा यावर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही याला योगायोग म्हणू शकता. मात्र एकामागून एक मृत्यू पाहिल्यावर, चित्रपटसृष्टीतील(Film Industry)  सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. स्क्रिप्टची सुरुवात कॅनेडियन लोकगीताने(Canadian Folklore)  होते.

धक्कादायक सत्य कथा
लोककथेनुसार, एक मुलगा अलास्कामध्ये आलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. मुलगा तिच्या मागे न्यूयॉर्कला जातो आणि मोठा माणूस बनतो. पण तो त्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की, तो सर्वस्व गमावून मरतो. या गाण्यावर एक कादंबरी (The Incomparable Atuk) देखील लिहिली गेली. यानंतर दिग्दर्शक नॉर्मन ज्यूसन (Norman Jewison)यांनी पटकथा लेखक टॉड कॅरोल यांना हा चित्रपट लिहिण्यास सांगितले, सुमारे 2 वर्षांनी चित्रपटाची कथा तयार झाली. 

6 जणांचा मृत्यू झाला
कॉमेडियन अभिनेता जॉन बेलुशीचा (John Belushi)स्क्रिप्ट वाचल्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर कॉमेडियन अभिनेता सॅम किनिसनचा (Sam Kinison) कार अपघातात आणि जॉन कॅंडीचा (John Candy)हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. या दोघांनीही चित्रपटाची कथा वाचली होती. या मृत्यूंमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय स्क्रिप्ट देणारी व्यक्ती मायकल ओ'डोनोघ्यू  (Michael O'Donoghue) देखील मृत्यू आढळून आली. असे मानले जाते की ख्रिस फार्ले आणि जॉन हार्टमन हे दोन्ही अभिनेते या शापित स्क्रिप्ट (Damned Script)वाचल्यामुळे मरण पावले. या मृत्यूनंतर चित्रपट कायमचा बंद झाला.

Web Title: Cursed Movie: The story of this movie got cursed; Suspicious death of 6 people after reading story...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.