Cyrus Mistry Death: ना अग्नी...ना दफन करून...पारसी समाजात असा केला जातो अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:47 PM2022-09-05T14:47:15+5:302022-09-05T14:55:41+5:30
Cyrus Mistry death :जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते.
Cyrus Mistry death : टाटा सन्सचे माजी चेअरमॅन सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये एका अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यावेळी कारने गुजरातच्या उदवाडाहून मुंबईला येत होते. कारमध्ये चार लोक होते. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आणि दोघेजण जखमी झाले. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूमुळे उद्योग विश्वात शोककळा पसरली आहे. सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून मृतदेह परिवाराकडे सोपवण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत किंवा डुंगरवाडीतील टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील.
कसा केला जातो पारसी लोकांमध्ये अंत्य संस्कार? - जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते. दोन प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. एक म्हणजे दफन केलं जातं नाही तर अग्नी दिलं जाते. हे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात केलं जातं. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची एक वेगळी प्रथा आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला ना दफन करतात ना अग्नी देतात. यासाठी त्यांची एक वेगळीच प्रथा आहे.
पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला 'दोखमेनाशिनी' असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर 'दोखमेनाशिनी' साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात.
भारतात पारसी लोक हे मुंबई शहरात सर्वात जास्त राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीला 'टॉवर ऑफ साइलेन्स' असं म्हटलं जातं. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्या मते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.
पूर्वी ही स्मशान भूमी अत्यंत शांत भागात असायची. पण शहरीकरणाने आता पूर्वीची शांतता राहिली नाही. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली.
त्यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं.
आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते. निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत.
काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं.