अनोखी घटना! 'या' ठिकाणी पडला पैशांचा पाऊस; हजारो लोकांची झुंबड, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:55 PM2023-10-26T14:55:06+5:302023-10-26T14:55:59+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

czech-influencer-drops-1-million-dollars-from-helicopter-people-rush-to-collect | अनोखी घटना! 'या' ठिकाणी पडला पैशांचा पाऊस; हजारो लोकांची झुंबड, पाहा VIDEO...

अनोखी घटना! 'या' ठिकाणी पडला पैशांचा पाऊस; हजारो लोकांची झुंबड, पाहा VIDEO...

Viral News: तुम्ही अनेकदा 'पैशांचा पाऊस' पडणे, हे वाक्य ऐकले असेल. हे वाक्य सत्यात उतरल्याची प्रचिती एका व्हायरल व्हिडिओवरुन होत आहे. चेक रिपब्लिक देशात अशीच अनोखी घटना घडली आहे. आभाळातून अचानक पैशांचा पाऊस पडला, हे पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएंसर आणि टीव्ही होस्ट कामिल बार्टोशेकने हेलिकॉप्टरमधून पैशांचा पाऊस पाडला. कामिल बार्टोशेकने लिसा नाड लबेम शहराजवळ हेलिकॉप्टरमधून $1 मिलियन डॉलर्स उधळले. याची सुरुवात झाली एका कोड्यापासून. कामिल त्याच्या 'वनमॅनशो: द मूव्ही' या चित्रपटातील कोडे सोडवणाऱ्या विजेत्याला दहा लाख रुपये देणार होता. मात्र, हे कोडे कोणालाच सोडवता आले नाही. 

हेलिकॉप्टरमधून पाडला पैशांचा पाऊस 
कामिलने स्पर्धेसाठी साइन अप केलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी सकाळी 6 वाजता त्यांनी एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये हे पैसे कुठे उधळले जाणार, याची गुप्त माहिती देण्यात आली. यानंतर ठरलेल्या ठिकाणी स्पर्धेत अर्ज करणारे लोक गोळा झाले, कामिलनेही आपला शब्द पाळला आणि हेलिकॉप्टरमधून पैसे उधळले. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. 

पिशवीमध्ये भरुन पैसे नेले
आकाशातून एक-एक डॉलरच्या नोटांचा पाऊस पडताच हजारो लोकांनी तासाभरात सर्व नोटा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जमा केल्या. ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक पिशव्या घेऊन शेतात धावत-धावत शक्य तितक्या नोटा गोळा करत असल्याचे दिसत आहे. 

 

Web Title: czech-influencer-drops-1-million-dollars-from-helicopter-people-rush-to-collect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.