वडिलांनी मुलाला दिलं जगातील सगळ्यात अनोखं नाव; सिद्ध करताना आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:56 AM2022-01-12T09:56:36+5:302022-01-12T09:57:31+5:30

माझ्या मुलाचं नाव ऑफिसच्या नावावर असावं ही माझी इच्छा होती असं वडिलांनी सांगितले.

Dad gives his son outlandish name inspired by his job | वडिलांनी मुलाला दिलं जगातील सगळ्यात अनोखं नाव; सिद्ध करताना आले नाकीनऊ

वडिलांनी मुलाला दिलं जगातील सगळ्यात अनोखं नाव; सिद्ध करताना आले नाकीनऊ

googlenewsNext

जकार्ता – लहान मुलांच्या नावाला घेऊन आजही पालक खूप उत्सुक असतात. मुलाचं नाव हटके असावं यासाठी अनेकजण सल्ले घेत असतात किंवा इंटरनेटवर स्वत: सर्च करत असतात. परंतु कधी कधी हटके नाव ठेवल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कारण यूनिक नावाच्या हौसेपायी पालक अशी नावं ठेवतात ज्याचं उच्चार करणंही कठीण जातं. असाच काहीसा प्रकार इंडोनेशियात समोर आला आहे.

याठिकाणी एका पित्याने त्यांच्या मुलाचं नाव Statistical Information Communication Office ठेवलं. ज्यानंतर स्वत:च्या मुलाचं नाव सिद्ध करण्यासाठी पित्याला त्याचे जन्मप्रमाणपत्र दाखवावं लागलं. इंडोनेशियाच्या ३८ वर्षीय समेट वाहुदीला(Samet Wahyudi) त्याच्या ऑफिसवर खूप प्रेम होते. त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न याच अटीवर केले होते की, त्यांना मुलगा झाल्यास त्याचं नाव ऑफिसच्या नावावर ठेवलं जाईल. लग्नाच्या आधी दोघांनी मुलाचं नाव Statistical Information Communication Office ठेवलं होतं. इंडोनेशियाई मीडियाने सांगितले की, समेटने लग्नापूर्वी त्याची बायको लिंडा हिला जर मुलगा झाला तर त्याचे नाव Statistical ठेवू असं सांगितले होते. लिंडाने समेटचं म्हणणं मान्य केले. परंतु त्याच्या आईवडिलांनी त्याला विरोध केला.

समेट वाहुदी म्हणाला की, २००३ मध्ये ब्रेब्स शहरात एका सिविल सेवकाच्या रुपात मला नोकरी मिळाली. माझं ऑफिसच माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखं बनलं होतं. त्यामुळे माझ्या मुलाचं नाव ऑफिसच्या नावावर असावं ही माझी इच्छा होती. हे नाव खूप यूनिक होतं. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुलाला डिंको हे उपनाव दिले असं त्याने सांगितले. सध्या इंडोनेशियात लहान मुलांना अजबगजब नाव देण्याची फॅशन बनली आहे. यापूर्वी आणखी एक असेच प्रकरण पुढे आले होते.

जेव्हा लहान मुलांचे लसीकरण सुरु झाले, तेव्हा एक मुलगा लस घेण्यासाठी केंद्रावर पोहचला. त्यावेळी त्याचे नाव ऐकून अधिकारी हैराण झाले. इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना विश्वास बसला नाही. तर काही लोकांनी याला फेक सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होणारं नाव ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. द सनच्या रिपोर्टनुसार, या पित्याने त्यांच्या मुलाचं नाव ABCDEFGHIJK ZUZU असं ठेवलं होतं. पित्याला क्रॉसवर्ड पज्ल्स खूप आवडत होते.

Web Title: Dad gives his son outlandish name inspired by his job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.