किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:02 PM2024-05-07T14:02:20+5:302024-05-07T14:04:26+5:30
क्रिप्टो एज्युकेटर अमित सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे
सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीझोतात येणं फार मोठी गोष्ट नाही. केवळ तुमच्या अंगात एखादा गुण, कला असायला हवी जे पाहून लोक आनंदी होऊ शकतील. सोशल मीडियाने अनेकांना रातोरात स्टार बनवलं आहे. दिल्लीच्या व्हायरल वडापाव गर्लपासून नागपूरच्या डॉली चायवाला अशी इंटरनेटवर तुम्हाला अनेक उदाहरणे सापडतील. सध्या अयोध्येतील गोलूने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतले आहे. ज्याच्या उत्तराने अनेक जण हैराण झालेत.
क्रिप्टो एज्युकेटर अमित सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, अयोध्येतील गोलू हा अनेक कामगारांपेक्षा जास्त कमावतो. त्यापेक्षा अधिक त्याच्यातील आत्मविश्वास दिसून आला. मी अयोध्येला राम मंदिर दर्शन करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा माझी ओळख तिने कपाळावर चंदनाचा टिळा लावणाऱ्या गोलूसोबत झाली. यावेळी मी त्याच्या कमाईबाबत विचारले. तर त्याने दिवसाच्या कमाईचा जो आकडा सांगितला तो ऐकून मी अवाक् झालो.
दिवसाला १५०० रुपये कमाई
हा मुलगा सांगतो की, मी सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत चंदनाचा टिळा लावण्याचं काम करतो. दिवसभरात जवळपास १५०० रुपये कमाई होते हे ऐकून अमितला धक्का बसतो, तो म्हणतो याचा अर्थ तुझा पगार डॉक्टरांच्या बरोबरीचा आहे. त्यावर मुलाने जे उत्तर दिले ते जबरदस्त होते.
तर गोलूमध्ये तो स्मार्टनेसपणा दिसला, जे शोधण्यासाठी मोठमोठ्या आयएएम फिरत असतात. परंतु खरी कला ही भारतातील गल्लीबोळात तुम्हाला गोलूच्या रुपाने दिसून येईल. ज्याच्यात आत्मविश्वास भरलेला आहे. जर या मुलांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन दिले तर ते काय करू शकत नाही?