देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 01:30 PM2020-08-08T13:30:51+5:302020-08-08T13:49:31+5:30
आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल.
आतापर्यंत तुम्ही गाय, म्हैस आणि बकरीचं दूध सेवन केलं असेल किंवा या प्राण्यांच्या दुधाचं मनुष्य सेवन करतात हे ऐकलं असेल. पण तुम्ही कधी गाढवीणीचं दूध सेवन केल्याचं ऐकलंय का? नाही ना? पण आता गाढवीणीचं दूध देशात चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी स्पेशल डेअरी सुरू केली जाणार आहे. असे सांगितले जाते की, गाढवीणीचं दूध आपलं इम्यून सिस्टीम ठीक करण्यासाठी फायदेशीर असतं. आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल.
१ लिटर दुधाची किंमत किती?
(प्रातिनिधीक छायाचित्र)
ब्रीडिंगनंतर डेअरीचं काम लवकरच सुरू केला जाईल. गुजरातच्या हलारी प्रजातीच्या गाढवीणीचं दूध औषधीचा खजिना मानलं जातं. हे दूध बाजारात दोन हजार ते सात हजार रूपये लिटर विकली जातं. या दुधाने कॅन्सर लठ्ठपणा, अॅलर्जीसारख्या आजारांसोबत लढण्याची क्षमता विकसित होते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या दुधापासून महागडे ब्युटी प्रॉडक्टही तयार केले जातात.
कोणतेही साइड इफेक्ट नाहीत
या प्रोजेक्टवर काम करणारे एनआरसीईतील वैज्ञानिक डॉक्टर अनुराधा भारद्वाज यांनी सांगितले की, अनेकदा गाय किंवा म्हशीच्या दुधाने लहान मुलांना अॅलर्जी होते. पण हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाने कधीही अॅलर्जी होत नाही. या दुधाची खासियत म्हणजे या अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी एजीन तत्व आढळतात जे शरीराल अनेक गंभीर आजारांसोबत लढण्याची क्षमता देतात.
डेअरीआधी डॉ. अनुराधा यांनीच गाढवीणीच्या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट तयार करण्याचं काम केलं होतं. त्यांची ही टेक्निक काही महिन्यांपूर्वीच केरळच्या कंपनीने खरेदी केली आणि ब्युटी प्रॉडक्ट तयार केले जात आहेत. गाढवीणीच्या दुधापासून साबण, लिप बाम, बॉडी लोशन तयार केले जात आहेत.
हे पण वाचा :
हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!
कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी