वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 05:15 PM2018-06-07T17:15:15+5:302018-06-07T17:17:42+5:30

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे डान्सिंग अंकलचं आयुष्य बदललं

dancing uncle gets 1000 phone calls in one week give mobile to brother offers for tv shows and bollywood | वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल

वाढत्या प्रसिद्धीमुळे 'डान्सिंग अंकल' हैराण; उचललं 'हे' पाऊल

googlenewsNext

मुंबई: एका व्हिडीओमुळे रातोरात इंटरनेटवर हिट झालेल्या डान्सिंग अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं आहे. काही दिवसांपूर्वी प्राध्यापक म्हणून साधंसोपं आयुष्य जगणारे डान्सिंग अंकल सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना विविध टीव्ही शोजच्या ऑफर्स मिळत आहेत. मात्र अचानक मिळालेली ही लोकप्रियता सध्या संजीव यांच्यासाठी त्रासदायक ठरते आहे.

एका कौटुंबिक कार्यक्रमात संजीव श्रीवास्तव यांची पावलं अशी काही थिरकली, की ते एका रात्रीत स्टार झाले. मात्र आता या लोकप्रियतेमुळे होणारा त्रास ओळखून संजीव यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. संजीव यांना गेल्या आठवड्याभरात 1 हजारहून अधिक फोन आले आहेत. या फोन कॉल्सला वैतागलेल्या संजीव यांनी त्यांचा मोबाईल भावाकडे सोपवला आहे. त्यामुळे आता संजीव यांचे भाऊच सर्व कॉल्स उचलतात. चाहत्यांचे फोन दिवसभर सुरू असल्यानं संजीव यांनी हा निर्णय घेतला. मात्र चाहत्यांशी संवाद कायम राहावा, म्हणून डान्सिंग अंकल ट्विटरवर सक्रीय झाले आहेत. 

सध्या डान्सिंग अंकलला बॉलीवूडच्या ऑफर्सही मिळू लागल्या आहेत. याकडे नीट लक्ष देण्यासाठी सतत खणाणणारा फोन त्यांनी भावाकडे सोपवला आहे. 'आपके आने से' गाण्यावरील नृत्यानंतर संजीव श्रीवास्तव यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखत दिली. त्या एका व्हिडीओमुळे संजीव यांना मोठी लोकप्रियता मिळाली. लोक त्यांच्या भेटीसाठी तासनतास घराबाहेर उभे असतात. डान्सिंग अंकल लवकरच बॉलीवूडमध्येही दिसण्याची शक्यता आहे. चांगल्या चित्रपटाची ऑफर आल्यास ती स्वीकारणार असल्याचं श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 
 

Web Title: dancing uncle gets 1000 phone calls in one week give mobile to brother offers for tv shows and bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.