एक असा ग्रह ज्यावर होतो हिऱ्यांचा पाऊस, हाच आहे सर्वात धोकादायक ग्रह?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 01:46 PM2020-01-01T13:46:51+5:302020-01-01T13:53:56+5:30
आपल्या आकाशगंगेतील चार ग्रह असे आहेत ज्यांवर माती आणि दगडांपेक्षा जास्त गॅस आहे. आणि यांचा आकारही विशाल आहे.
आपल्या आकाशगंगेतील चार ग्रह असे आहेत ज्यांवर माती आणि दगडांपेक्षा जास्त गॅस आहे. आणि यांचा आकारही विशाल आहे. वरूण(नेपच्यून) सुद्धा याच ग्रहांपैकी एक ग्रह आहे. वरूण हा ग्रह तसा पृथ्वीपासून फार जास्त दूर असून हा सर्वात धोकादायक ग्रह आहे. कारण येथील तापमान शून्य ते २०० डिग्री सेल्सिअस खाली राहतं. या तापमानात मनुष्य अशा गोठेल की, एखाद्या दगदडासारखा तुटेल.
वरूण हा आपल्या आकाशगंगेतील असा पहिला ग्रह आहे ज्याच्या अस्तित्वाची भविष्यवाणी त्याला न पाहता गणिताच्या माध्यमातून केली गेली होती. त्याच आधारावर नंतर त्याचा शोध घेण्यात आला. हे तेव्हा झालं जेव्हा वरूणच्या परिक्रमेत काहीतरी गडबड झाली. याचा अर्थ हा होता की, एक अज्ञात ग्रह त्याच्यावर आपल्या गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव टाकत असेल.
वरूणला पहिल्यांदा २३ सप्टेंबर १८४६ ला दूरबिनीच्या माध्यमातून बघण्यात आलं आणि याचं नाव नेपच्यून ठेवण्यात आलं. नेपच्यून हा एक प्राचीन रोमन धर्मातील समुद्राचे देवता होते. त्यामुळेच हिंदीत या ग्रहाला वरूण असं म्हटलं जातं. रोमन धर्मात नेपच्यून देवतेच्या हाती त्रिशूल होता. त्यामुळे वरूणचं खगोलशास्त्रीय चिन्ह ♆ असं आहे.
वरूण ग्रहावर जमा झालेल्या मीथेन गॅसचे ढग उडत असतात आणि हवेचा वेग इतर ग्रहांपेक्षा कितीतरी अधिक आहे. इथे मीथेनच्या सुपरसोनिक हवेला रोखण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे येथील हवेचा वेग १५०० मैल प्रति तासपर्यंत पोहोचतो.
वरूण ग्रहावरील वायुमंडळात कार्बन असल्याने इथे हिऱ्यांचा पाऊसही पडतो. जर मनुष्य या ग्रहावर पोहोचला तरी हिरे वेचू शकणार नाही. कारण इथे थंडी इतकी असेल की, मनुष्य लगेच गोठेल.