बाबो! इथे आहेत डेटिंग कसं करतात शिकवणारे कोचिंग क्लासेस, मुलांना शिकवले जातात खास फंडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:46 PM2020-01-18T12:46:42+5:302020-01-18T12:52:46+5:30

अशी काय समस्या आली की, लोकांना डेटिंग क्लासेसची सुरूवात करावी लागली.

Dating tips classes on romance becoming popular in China | बाबो! इथे आहेत डेटिंग कसं करतात शिकवणारे कोचिंग क्लासेस, मुलांना शिकवले जातात खास फंडे!

बाबो! इथे आहेत डेटिंग कसं करतात शिकवणारे कोचिंग क्लासेस, मुलांना शिकवले जातात खास फंडे!

googlenewsNext

(Image Credit : tellmehow.co)

आजचा जमाना हा डेटिंगचा आहे. पण अनेकांना डेटिंगचे डिटेल्सच माहीत नसतात. तुम्हाला हे माहीत आहे का की, प्रेमाच्या संवादात फार संवेदनशील आणि आपल्या पार्टनरच्या भावनांची काळजी घ्यावी लागते? एका यशस्वी डेटिंगसाठी तुम्हाला डान्सही करता यावा लागतो? या प्रश्नांची उत्तरे नाही असतील, तर यावर एक उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला चीनच्या एका अशा स्कूलबाबत सांगणार आहोत, ज्यात चक्क यशस्वी डेटिंग करण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. 

चीन हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा देश आहे. इथे मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत अधिक आहे. याचं कारण म्हणजे चीनमध्ये एक अपत्य धोरण होतं. यामुळे सेक्स रेशो बिघडला. त्यामुळे आज चीनच्या तरूणांमध्ये मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळेच इथे डेटिंग स्कूल आणि कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत.

(Image Credit : youngisthan.in)

बीजिंगमध्ये एक असंच स्कूल आहे 'लव्ह  एनर्जी'. हे स्कूल कुई ऊर्फ मोका मॅजिक कार्ड चालवतात. ते सांगतात की, डेटिंग एका परफेक्ट डान्ससारखी असते. कधी तुम्हाला पार्टनरला स्वत:कडे खेचायचं असत तर कधी दूर करायचं असतं. हे करत असताना तुम्हाला सतत संवेदनशील रहावं लागतं.

लव्ह कोचिंगची क्रेझ चीनमध्ये फारच वाढत आहे. याचा जर ऑनलाइन कोर्स केला तर तर महिन्याला ३० डॉलर इतकी फि द्यावी लागते. आणि जर तुम्ही क्लासमध्ये जाऊन लव्ह आणि डेटिंगबाबत शिकाल तर तुम्हाला महिन्याला ४५०० डॉलरपर्यंत खर्च करावा लागू शकतो. या क्लासेसचे जास्तीत जास्त ग्राहक हे २३ ते ३३ वयोगटातील आहेत. 

इथे केला जातो मुलांचा मेकओव्हर

(Image Credit :love4life.in)

या लव्ह कोचिंग सेंटर्समध्ये मुलांचा मेकओव्हर केला जातो. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलसाठी चांगले फोटो काढले जातात. त्यांना एक काबे डान्स जपानी डान्स प्रकार शिकवला जातो. यात एका मुलीला कसं इम्प्रेस करावं हे शिकवतात.

काय आणि कसं शिकवतात?

(Image Credit : independent.co.uk)

अंतर्मुख मुलांना तर ही समस्या अधिक येते. ते मुलींसोबत प्रेमाच्या गोष्टी करायला घाबरतात. या समस्येसोबत लढण्यासाठी त्यांना योग्य ते ट्रेनिंग दिलं जातं. मॅजिक कार्ड यांच्यानुसार, मुलींसोबत मैत्री करण्याची इच्छा असेल तर मुलांनी इकडच्या-तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा थेट विचारलं पाहिजे की, मुझसे दोस्ती करोगी? 


Web Title: Dating tips classes on romance becoming popular in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.