बोंबला! सूपमध्ये त्यांना असं काही दिसलं की परिवारातील सर्वांना करावी लागली कोरोना टेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:30 PM2020-07-24T12:30:20+5:302020-07-24T12:36:46+5:30
ही घटना आहे वुहानमधील. इथे एका फॅमिलीने सूप ऑर्डर केलं होतं. त्यांची जेव्हा सूपचा बॉक्स उघडला तेव्हा त्यात त्यांने जे दिसलं ते पाहून ते घाबरले.
वुहानमधून निघालेला कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. काही वैज्ञानिकांनी दावा केला की, कोरोना व्हायरस वटवाघळातून मनुष्यांमध्ये आला. तर काहींनी हे मान्य केलं नाही. गदरोळ झाल्यावर चीनमधील सी फूड आणि वेट मार्केट बंद केले होते. पण नंतर ते सुरू झाले. अशात चीनमधूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे वुहानमधील. इथे एका फॅमिलीने सूप ऑर्डर केलं होतं. त्यांची जेव्हा सूपचा बॉक्स उघडला तेव्हा त्यात त्यांना जे दिसलं ते पाहून ते घाबरले.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, येथील एका परिवाराने रेस्टॉरन्टमधून पोर्क सूप ऑर्डर केलं होतं. स्थानिक मीडियानुसार, चेन नावाच्या परिवाराने आपल्या घराजवळील रेस्टॉरन्टमधून फरोजन पोर्क सूप ऑर्डर केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी इथे सूप प्यायलं होतं. तेव्हा त्यात विचित्र असं काही नव्हतं. पण यावेळी त्यांनी जेव्हा तीन दिवसांनी सूप पिण्यासाठी काढलं तेव्हा त्यातून त्यांना एक मेलेलं वटवाघुळ दिसलं.
चेन यांनी सांगितले की, 'मी सूप पुन्हा गरम करण्यासाठी काढलं. मला त्यात काहीतरी काळ्या रंगाचं दिसलं. ते एक छोटं वटवाघुळ होतं'. चेनच्या आईने विचार केला की, तो काळ्या रंगाचा काही मसाला असावा. पण त्यांनी जेव्हा चॉपस्टिकने चेक केलं तर त्यांना पंख आणि कान दिसले. तसेच पायही दिसले.
नंतर ते हे सूप घेऊन रेस्टॉरन्टमध्ये गेले. त्यांनी पैसे परत मागितले. पण रेस्टॉरन्टच्या मालकाने त्यांची काहीच चूक नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, 'वटवाघुळ रात्री अॅक्टिव असतात. पण आम्ही दिवसा सूप तयार करतो. नंतर भांड सील करतो'. ते म्हणाले की, जेव्हा फॅमिली सूप गरम करत असेल तेव्हाच वटवाघुळ पडलं असेल.
दरम्यान परिवाराने स्थानिक प्रशासनाला याबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी परिवारातील सर्वांना कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितली. सर्वांचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. बाकी सूपमध्ये वटवाघुळ कसं पडलं याची चौकशी सुरू आहे.
लॉनमधील गवत कापत होते वडील, अचानक एक खिळा उडून मुलाच्या डोळ्यात घुसला अन्
फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!
आता बोला! बाइक रेस बघण्यासाठी चक्क क्रेन घेऊन आले लोक, सोशल डिस्टंसिंगची अनोखी आयडियाची कल्पना!