ड्रॅगनसारखा दिसतो हा छोटासा किडा, व्हिडिओ बघुन म्हणाल...किती खतरनाक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:45 PM2021-08-04T15:45:20+5:302021-08-04T15:45:55+5:30
एक छोटासा किडा पण जेव्हा तो त्याचे तोंड उघडतो तेव्हा भले मोठे प्राणीही त्याला घाबरुन पळून जातात. या किड्याचं नाव आहे डेड लीफ. हा जेव्हा त्याचा जबडा उघडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं आपल्या समोर साक्षात ड्रॅगनच उभा आहे.
काही जीव इवलेसे असतात पण त्यांची दहशत मोठ्या जीवांनाही धुळ चारते. अशांना पाहुन आपण नक्कीच म्हणून शकतो की मुर्ती लहान पण किर्ती महान. असाच एक छोटासा किडा पण जेव्हा तो त्याचे तोंड उघडतो तेव्हा भले मोठे प्राणीही त्याला घाबरुन पळून जातात. या किड्याचं नाव आहे डेड लीफ. हा जेव्हा त्याचा जबडा उघडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं आपल्या समोर साक्षात ड्रॅगनच उभा आहे.
Dead Leaf Mantis is a large Mantis from Malaysia that is camouflaged as a dead leaf. Females are about 9cm and males around 7-8 cm. They display their wings when threatened, this is called a deimatic display, designed to scare off predators.
— Science & Nature (@ScienceIsNew) August 4, 2021
🎥: Marcus Kam pic.twitter.com/IQpMD4jNlR
@scienceisnews या ट्वीटर हँडलवरून या किड्याचा खतरनाक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये या किड्याची माहिती दिली आहे. हा किडा मलेशियामध्ये आढळतो. याला डेड लीफ असं म्हणतात. याची उंची सेंटीमीटर ७ ते ८ असते तर स्त्री किड्याची उंची असते ९ सेंटीमीटर. जेव्हा त्याला शिकारीचा धोका असतो तेव्हा तो आपले पंख पसरतो.